‘हवेचा झोका बदलला की कचरा पुन्हा आमच्या दारात’; राऊतांची कायंदेंवर घणाघाती टीका

‘हवेचा झोका बदलला की कचरा पुन्हा आमच्या दारात’; राऊतांची कायंदेंवर घणाघाती टीका

Sanjay Raut reaction on Manisha Kayande will join Shinde’s Shivdsena: ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. मात्र त्याआधीच ही बातमी आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या घडामोडींवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कायंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

कोण आमदार? बघा हे जे असे लोक असतात ना हा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका बदलला की तोच कचरा पुन्हा आमच्या दारात येऊन पडतो. त्याकडे दु्र्लक्ष करा. फार महान लोकं नाहीत ते. अशा लोकांना पक्षात प्रवेश दिला तरी त्यांना महत्वाची पदे देऊ नयेत अशी आमची उद्धव ठाकरेंकडे आग्रहाची मागणी आहे. मागील वर्षभरात आम्ही जो त्रास सहन केला आहे तो अशा लोकांमुळेच सहन केला आहे.

पण, कडवट शिवसैनिक कुठेही गेले नाहीत. ज्यांना कवडीची किंमत नसते, पिसं झडलेले लोक असतात. आमच्याकडे आल्यावर त्यांना मोराचा पिसारा लावला जातो मग तो पिसारा फुलवत ते हसत तिकडे नाचत असतात, असे राऊत म्हणाले.

विदर्भात भाजपला मिळाला आक्रमक शिलेदार; आशिष देशमुखांचा गडकरींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी कायंदे यांच्या पक्षप्रवेशावर टीका केली. आमदारांचे काही अतृप्त आत्मे आमच्या पक्षात आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांना मोठी पदं दिली. तरी ते स्वार्थासाठी जात असतील. त्यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत आला आहे. तसेच त्या पुन्हा निवडून येण्याचीही शक्यता नाही त्यामुळे त्यांनी उडी मारली असेल अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराचा जय महाराष्ट्र

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, कायंदे यांचा फोन मागील काही तासांपासून नॉट रिचेलबल होता. महाशिबिराच्या दिवशी संबंधित आमदार कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या व्यतिरिक्त आणखी तीन नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचीही माहिती आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube