Maharashtra Rain : आज पुण्यासह ‘या’ 4 जिल्ह्यांत अतिमुसळधार; शाळांना सुट्टी जाहीर

Maharashtra Rain : आज पुण्यासह ‘या’ 4 जिल्ह्यांत अतिमुसळधार; शाळांना सुट्टी जाहीर

Maharashtra Rain : मुसळधार पावसाने राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. त्यापाठोपाठ आता उत्तर महाराष्ट्रातही पावसाने जोर धरला आहे. पावसचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.

आयएमडीनुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी हा रेड अलर्ट आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबल्या होत्या. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचीही वेळ आली होती. आता मात्र पाऊस इतका बरसत आहे की सगळीकडेच तारांबळ उडाली आहे.

नगरकरांनो अलर्ट! हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा; येत्या दोन दिवसात जिल्ह्यात…

पालघर, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर काही दिवस कायम राहिल असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. या जोरदार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजांना सुट्टी दिली आहे. रायगड जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट आहे. त्यामुळे खबरदारी घेत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

नगरमध्ये संततधार

पुण्याशेजारील नगरमध्येही काल दुपारनंतर संततधार पावसाने हजेरी लावली. रात्रभर हा पाऊस सुरू होता. मान्सूनच्या आगमनानंतर पहिल्यांदाच इततका वेळ पाऊस बरसत होता. बुधवारीही सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. हवेत गारठा वाढला आहे. या बदललेल्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांतही वाढ झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube