अजितदादांनी धाडले शिंदे-फडणवीसांना पत्र; सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

अजितदादांनी धाडले शिंदे-फडणवीसांना पत्र; सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

Ajit Pawar : राज्यातील लोककलावंतांसाठी महामंडळ तातडीने स्थापन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान केली होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी राज्य सरकारने लोककलावंतांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी तातडीने स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती असलेल्या तमाशाकलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून देणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानानं चांगलं जीवन जगता यावं, त्यांच्या निवास, भोजन, औषधोपचारांची सोय व्हावी, लोककलावंतांसाठी वृध्दाश्रम असावेत, त्यांना अल्पव्याजाने कर्ज मिळावे, मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी महामंडळ स्थापन करावे, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनातील चर्चेवेळी सरकारकडे तमाशासह सर्व लोककलावंतांसाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती. परंतु सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणतात की, तमाशा ही महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती आहे.

Pandharpur Vitthal Mandir कायमस्वरूपी ताब्यात ठेवू शकते? राज्य सरकारला स्पष्टीकरणाचे न्यायालयाचे निर्देश

राज्यातील मागास, अतिमागास समाजातील कलावंतांच्या पिढ्यांनी त्यांच्या त्याग, समर्पणातून ही कला जिवंत ठेवली, वाढवली, समृद्ध केली. तमाशाकलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून दिली. या तमाशा कलावंतांसह राज्यातील समस्त लोककलावंतांच्या मान-सन्मानाकडे, हक्कांकडे, विकासाकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

बहुतांश लोककलावंतांच्या वाट्याला हलाखीचे जीवन येते, त्यांच्या आयुष्याचा शेवट हलाखीत जातो. हे टाळण्यासाठी लोककलावंतांसाठी वृध्दापकाळात राहण्याची, जेवण्याची, औषधांची व्यवस्था केली पाहिजे. त्यांच्यासाठी वृद्धाश्रम, अल्प व्याजदरात कर्ज, मोफत आरोग्य सुविधा, मुलांच्या शिक्षणाची सोय असली पाहिजे. शासनाच्या विकासयोजनांचा लाभ कलावंतांपर्यंत पोहोचविला पाहिजे. त्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज आहे.

राष्ट्रवादीत खरंच भाकरी फिरली का?

राज्यातील लोककलावंतांकडूनही सातत्याने ही मागणी होत आहे. राज्य शासनाने नुकत्याच घोषित केलेल्या सात महामंडळांबरोबर या महामंडळाचीही घोषणा होईल, ही अपेक्षा होती. परंतु, तसं न घडल्यानं, राज्यातील लाखो लोककलावंतांचा अपेक्षाभंग झाल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

राज्यातील लोककलावंतांची आग्रही मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने, लोककलावंतांसाठी तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, महामंडळाचे कामकाज लवकरात लवकर सुरू करुन लोककलावंतांना दिलासा द्यावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube