राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर पवार पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, या निर्णयाचे नुकसान..

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर पवार पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, या निर्णयाचे नुकसान..

Sharad Pawar : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला. राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेसचाही हा दर्जा रद्द करण्यात आला. पण आम आदमी पार्टीला मात्र राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळाला. आप दोन राज्यात सत्तेत आहे. तसेच गुजरात निवडणुकीतही या पक्षाने चांगली कामगिरी केली आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानंतर आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रथमच भाष्य केले आहे.

‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का! राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

शरद पवार म्हणाले, ‘राष्ट्रीय पक्ष याचा अर्थ एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. त्यामुळे देशातील कोणत्याही राज्यात त्या पक्षाचा उमेदवार उभा राहिल्यास अधिकृत चिन्हावर निवडणूक लढता येते. तसेच काही सवलतीही मिळतात. आता राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. याचे कारण निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. चार राज्यांत सहा टक्के मते मिळायला पाहिजेत. महाराष्ट्र, नागालँड, अंदमान-निकोबारमध्ये तेवढी मते पक्षाला आहेत. मात्र, अंदमान निकोबारची मते आयागाने ग्राह्य धरली नाहीत.’

‘या निर्णयाचा परिणाम म्हणून उद्या कर्नाटकात निवडणुका झाल्यास आमच्या उमेदवारांना चिन्ह मिळेल. मात्र, निवडणूक प्रचाराच्या वेळी राष्ट्रीय वाहिन्यांवर मिळणारा वेळ कमी होणार आहे. प्रचारासाठी फक्त 40 लोक असतात त्यातील 50 टक्के कमी होतील. हे आमचे नुकसान होणार आहे’, असे पवार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

चंद्रकांत पाटलांना मनसेनं फटकारलं; दाखवला ‘तो’ व्हिडीओ

दरम्यान,  या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रया दिली होती. ते म्हणाले, ‘राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षाकडे राहू शकतो याचे काही निकष आहेत. गेल्या दोन वर्षात याबाबत सुनावणी झाली. यात आम्ही आमची बाजू मांडली होती. परंतू आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. येत्या काळात काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये आमची कामगिरी समाधानकारक झाली तर हा दर्जा पुन्हा मिळू शकतो.’ असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

‘निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय देशातील इतर पक्षांबाबतही घेतला आहे. यात अनेक वर्ष जुना असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचाही समावेश आहे. या निर्णयावर मतमतांतरं आहेत, मात्र आता निर्णय झाला आहे.” याशिवाय त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाला धक्का लागेल असं वाटत नाही.’

‘आमच्या पक्षाच्या चिन्हाला धक्का लागेल असं वाटत नाही. घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह कायम राहील. महाराष्ट्रापुरता या चिन्हाला कोणताही धक्का लागेल, असं वाटतं नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा याची आम्हाला चिंता नाही.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube