सुजात आंबेडकरांची ‘ही’ कमेंट वागळेंना झोंबली; म्हणाले, त्यांच्याविषयी माझं मत..

सुजात आंबेडकरांची ‘ही’ कमेंट वागळेंना झोंबली; म्हणाले, त्यांच्याविषयी माझं मत..

Nikhil Wagle vs Sujat Ambedkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकारणात रंगल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले होते. या वृत्तना नंतर राज्यात मोठा गदारोळ उठला. खुद्द अजित पवार यांनाच माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट करावी लागली होती. राजकारणात या घटनेचे पडसाद अजूनही उमटत असतानाच आता ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) आणि वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच जुंपली आहे.

त्याचे असे झाले, की वागळे यांनी दोन दिवसांपूर्वी वृत्तपत्राने दिलेले हे वृत्त सोशल मीडियात पोस्ट केले होते. त्यावर सुजात आंबेडकर यांनी फेसबुक पोस्ट करत आक्रमक प्रतिक्रिया दिली होती.

निखील वागळे वर्षभर वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे,असे म्हणत होते. प्रकाश आंबेडकरांचे राजकारण नेहमची भाजपला मदत करणारे असते. भाजपला हरवायचे असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीला साथ द्यावी असे म्हणत होते. आता म्हणतात अजित पवार भाजपमध्ये कधी जाणार, अप्रतिम पत्रकारिता. प्रथम ही बातमी ब्रेक केल्याबद्दल पत्रकारालाही सलाम, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते.

त्यावर संतप्त होत वागळे यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘सुजात आंबेडकरविषयी माझं बरं मत होतं. पण, किती थिल्लर निघाल तो !’ असे ट्विट त्यांनी केले.

‘त्या’ घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी! न्यायालय योग्य तो…

नेटकरी खवळले !

या ट्विटवर नेटकऱ्यांनी मात्र वागळे यांना चांगलेच ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने तर त्यांना इतरांना बी टीम ठरवताना एखादा पुरावा दिला पाहिजे होता.मात्र ते सोडून इतरांना थिल्लर बोलून स्वतःची लायकी दाखवून दिली आहे. बोलताना शब्द जरा जपून वापरा, असे म्हटले आहे. दुसऱ्या एकाने म्हटले, की तुमच्याविषयी माझंही मत चांगलं होतं. पण, तुम्हाला काँग्रेसचा किल्ला लढवताना बघितल अन् वाटलं काय थिल्लर पत्रकार आहे हा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube