मी फिल्डवर काम करणारा मुख्यमंत्री, घरात बसणारा नाही; शिंदेंनी ठाकरेंना फटकारले !
Eknath Shinde : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असताना राज्याचे मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर गेल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. याच टीकेला आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सडेतोड उत्तर दिले. शिंदे म्हणाले, राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झाले मला माहिती आहे. अयोध्येत असतानाही मी राज्यातील अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले फिल्डवर जा, शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करा. पंचनामे करा. असे माझे काम आहे. मी काही घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. तर फिल्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे, असे प्रत्युत्तर शिंदे यांनी दिले.
PM Modi: भारतात वाघांच्या संख्येत वाढ; पीएम मोदींनी आकडेवारी केली जाहीर
शिंदे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. राज्यात कालपासून ठिकठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. विरोधकांनी ही संधी साधत शिंदेंवर हल्लाबोल केला. शेतकरी संकटात असताना यांचा अयोध्या दौरा सुरु आहे, अशी टीका होत होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले.
राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. नेमक्या याचवेळी मुख्यमंत्री अयोध्येत आहेत. हीच संधी साधत विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. या टीकेला त्यांनी आज थेट अयोध्येत पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. मी जरी अयोध्येत असलो तरी सतत राज्यातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. त्यांना आवश्यक सूचना देत आहे असे ते म्हणाले.
आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारवरही त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, पालघरमध्ये साधुंचे हत्याकांड झाले तेव्हा कुणाचे सरकार होते ?, नेव्ही ऑफिसरला मारलं तेव्हा कुणाचं सरकार होते ?, रवी राणा आणि नवनीत हनुमान चालीसा वाचायला गेले तेव्हा देशद्रोहाचे कलम लावून 14 दिवस तुरुंगात टाकले तेव्हा कुणाचे सरकार होते ? विरोधात बोलले म्हणून पत्रकाराला मारले तुरुंगात टाकले तेव्हा कुणाचे सरकार होते ? परवा पालघरमध्ये दोन साधुंचे हत्याकांड आपल्या लोकांनी वाचवले आपले सरकार नसते तर त्या साधुंनी देखील जीव गमावला असता.
उद्धव ठाकरेंनी भाजपशी विश्वासघाताचं… बावनकुळेंचा घणाघात
रावणराज्य कुणाचे होते त्यांचे की आमचे ? असे जळजळीत सवाल उपस्थित करत त्यांचे रावणराज्य होते. त्यांच्या पापाचा घडा भरला होता. म्हणून जनतेने ते सरकार हटवले, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
राम वनवासात गेले यांनी काय केले ?
2014 मध्ये हिंदुत्वाचे विचारांचे सरकार आले आणि हिंदुत्वाचा मान वाढला. याआधी बाळासाहेब ठाकरेंनीच गर्व से कहो हम हिंदू है हा नारा दिला होता. आज मात्र काही जण मतभेद करत आहेत. पण भाजप आणि शिवसेनेची विचारधारा एकच आहे. रामांनी कुणाला वचन दिले नव्हते पण तरीही दुसऱ्याचे वचन राखण्यासाठी राम स्वतः वनवासात गेले. वचनाचा मान राखला आणि दुसरीकडे यांनी (उद्धव ठाकरे) काय केले ? तुम्हाला माहिती आहे मी सांगण्याची गरज नाही. बाळासाहेबांच्या विरोधात गेले, सत्तेसाठी दिलेले वचनही मोडले पुढे काय घडले हे मी सांगण्याची गरज नाही असे शिंदे म्हणाले.