Video : कोण ओळखतो त्या खडसेला?; महाजनांनी घरातला वाद काढत केला जिव्हारी लागणारा वार

Girish Mahajan On Eknath Khadse खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे कळत नाहीत. खडसेंबाबत आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही.

  • Written By: Published:
Video : कोण ओळखतो त्या खडसेला?; महाजनांनी घरातला वाद काढत केला जिव्हारी लागणारा वार

Girish Mahajan On Eknath Khadse : गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे परस्परांचे कट्टर विरोधक मानले जातात. आता गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर बोचरी टीका केली. ‘कोण ओळखतो त्या खडसेला?’ असे म्हणत गिरीश महाजन खडसेंच्या घरातच वाटाघाटीच राजकारण असल्याचे म्हटले आहे.  आमच्या पक्षाला शिव्या घालायच्या व घरातल्या घरात सोयीच राजकारण करायचं अशी एकनाथ खडसेंची भूमिका असल्याचे सांगत महाजनांनी जोरदार हल्लाबोल केला.

खडसे कोणत्या पक्षात हेच कळत नाही 

मुक्ताईनगर शहरात आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद कमी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार नसल्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना महाजन म्हणाले की, मुक्ताईनगर मध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला ते बरोबरच बोलले आहे. खडसे कुठल्या पक्षात आहे तेच मला कळत नाही. ते स्वतःला महाराष्ट्राचे नेते म्हणतात. मुख्यमंत्री पदाचे दावेदार नेते म्हणतात. पण, मुक्ताईनगरमध्ये पक्षाची ताकद कमी असल्याचं म्हणतात काय बोलावं त्यांच्याबद्दल, प्रत्येकाची वेळ येते जाते. खडसे प्रत्येक वेळेस आपली भूमिका बदलतात असेही महाजन म्हणाले.

खडसेंच्या घरातच सोयीचं राजकारण

एकनाथ खडसे एवढे मोठे बलाढ्य नेते आहेत त्यांनी एक तरी नगरपालिका निवडून आणली असती. इकडे आमच्या पक्षाला शिव्या घालायच्या व तिकडे घरातल्या घरात सोयीच राजकारण करायचं असं एकनाथ खडसेची नेहमी भूमिका आहे. खडसे यांच्या घरातच वाटाघाटीच राजकारण आहे. खडसे एवढे मोठे बलाढ्य नेते आहेत त्यांनी एक तरी नगरपालिका निवडून आणली असती. खडसे यांचा आम्हाला काही फायदा नाही त्यांनी सोयीचा राजकारण करत राहावं असा सल्लाही महाजन यांनी खडसेंना दिला.

follow us