नारायण राणेंना मंत्रिपद दिलं, शिवसेना तिथचं चिडली; शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

नारायण राणेंना मंत्रिपद दिलं, शिवसेना तिथचं चिडली; शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथेचे येत्या मंगळवारी मुंबईत प्रकाशन होत आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक राजकीय घडामोडींचा खुलासा केला आहे. पवार यांनी या पुस्तकात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबतही एक खुलासा केला आहे. भाजपने नारायण राणे यांचा पक्ष विलीन करून घेतला. त्यानंतर केंद्रात मंत्रीपद दिलं. या प्रकारने खऱ्या अर्थाने शिवसेना चिडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंना नाचवण्याचे काम राष्ट्रवादी करतेय, दरेकरांचा हल्लाबोल

या पुस्तकात पवार म्हणतात, शिवसेना हा भावनिक पिंड असलेला पक्ष आहे. त्याच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा डाव रंगला होता. एकेकाळी महाराष्ट्रात शिवसेना विधानसभेच्या 171 जागा लढवत असे तर भाजप 117. शिवसेनेला 124 जागा सोडत भाजपने तब्बल 164 जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. स्वतःच्या बळावर पूर्ण बहुमत मिळवत शिवसेनेचं ओझं उतरवून ठेवायचाच चंग अति आत्मविश्वासात दंग भाजपन बांधला होता.

नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार.परंतु त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलन करून घेत शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यात आलं, असं पवार यांनी या पुस्तकात म्हटले आहे.

“इधर उधर की बात न करो, ये बताओ अदानी से आपका रिश्ता है क्या?”, ‘मन की बात’ वरून नाना पटोलेंचा मोदींना टोला

कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र येथे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार भाजपच्या छुप्या पाठिब्यावर शिवसेनेविरुद्ध लढत होते. तर 50 विधानसभा मतदारसंघात बंडखोरीचे आव्हान होते. अशा बहुतेकांनी ठोकलेले दंड हे नेत्यांच्या आशिर्वादाने पक्षाच्या पाठबळावरच होते, हे आमच्याही लक्षात आल्याचं पवार यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

अन् भाजप नेत्यांचा सूरच बदलला

भाजप-शिवसेना पक्षात जेव्हा केव्हा संवादाची गरज असे तेव्हा भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व मातोश्रीवर जात असे. बदलत्या परिस्थितीतही उद्धव ठाकरे यांची आणि शिवसेनेची हीच अपेक्षा भाजपकडून होती. बाळासाहेबांचं स्थान लक्षात घेत आमचे नेते मातोश्रीवर जात तीच अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी ठेवणं अनाठायी आहे, असा सूर भाजपातील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube