Maharashtra Political Crisis : अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा संताप; म्हणाले, असे वक्तव्य..

Maharashtra Political Crisis : अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा संताप; म्हणाले, असे वक्तव्य..

Sanjay Raut on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आता अगदी काही मिनिटांवरच येऊन ठेपला आहे. न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या एका वक्तव्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच संतापले आहेत. अजित पवार असं कसं बोलू शकतात, असा सवाल त्यांनी केला.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते, सप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे. पण, मला वाटतं ते विधानसभा अध्यक्षांकडे प्रकरण सोपवतील. ही शक्यता नाकारता येत नाही. विधिमंडळातील बाब असल्याने ते विधानसभा अध्यक्षांनाच याची माहिती घेत निर्णय घेण्यास सांगतील, अशी शक्यता व्यक्त केली होती. तसेच 145 आमदारांचं पाठबळ आहे तोपर्यंत सरकारला धोका आहे, असं म्हणता येणार नाही, असेही पवार म्हणाले होते.

Anil Parab : शिंदे गटाचे फक्त 16 नाही, तर तब्बल 39 आमदार अपात्र होणार

पवार यांच्या या वक्तव्यावर राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. मी महाविकास आघाडीचा नेता आणि शिवसेनेचा खासदार असून मला वाटतं सरकारला धोका आहे. जर 16 आमदार अपात्र झाले तर राहिलेले 24 देखील अपात्र होतील. सरकारला धोका नाही, असं कसं काय कोणी बोलू शकतं, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

देशात विधानसभा, संसद, न्यायालय संविधानानूसार काम करतात की नाही हे उद्या कळणार आहे. देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र की कोणाच्या दबावाखाली काम करते, याचाही फैसला उद्या होणार असून जे लोकं आमच्या बाजूने निकाल लागणार असल्याचं म्हणातहेत त्यांनी काहीतरी गडबड केली आहे, असेही राऊत म्हणाले.

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आमच्याच बाजूने निकाल लागणार आहे, असं आम्ही म्हणत नाही पण आम्हाला उद्या न्याय मिळणार आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात देशाच्या भविष्याचा निकाल लागणार आहे. सरकार येईल, जाईल पण सर्वोच्च न्यायालयात भविष्याचा निकाल होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube