‘बळीराजावर उद्धवस्त होण्याची वेळ पण, मोदी सरकार फोडाफोडीत मग्न’; ठाकरे गटाचा हल्लाबोल

‘बळीराजावर उद्धवस्त होण्याची वेळ पण, मोदी सरकार फोडाफोडीत मग्न’; ठाकरे गटाचा हल्लाबोल

देशातील वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. सरकार महागाई रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत ठाकरे गटाने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सामनातून केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली आहे. विद्यमान सरकारकडे कृषी धोरण नसल्याने मागील सात ते आठ वर्षांत देशातील बळीराजावर उद्धवस्त होण्याचीच वेळ आली आहे. सर्वसामान्यांची केंद्रीय सत्तापक्षाला फिकीर कुठे आहे, असा सवाल विचारण्यात आला आहे.

अनिल गोटेंनी राष्ट्रवादी भवनाला कुलूप लावताच…दोन गट भिडले ! दादांचा गट पडला भारी

देशात सध्या सर्वच प्रकारच्या महागाईने टोक गाठले आहे. धान्य, डाळी आणि साखरेच्या टंचाईच्या भीतीची पडली आहे. या परिस्थितीची सरकारल कितपत जाणीव आहे हा प्रश्चच आहे. हे सरकार फक्त विरोधी पक्षांच्या फोडाफोडीत, केंद्रीय तपास यंत्रणांचा दहशतवाद माजविण्यात आणि निवडणुकीच्या राजकारणातच मग्न आहे. म्हणूनच काही महिन्यांपासून महागाईचा आलेख चढता असूनही सरकार ढिम्मच आहे.

अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला, फळे आणि साखरेसह अन्य पिकांचे उत्पादन निसर्गावर अवलंबून आहे हे खरेच आहे. तथापि त्याच्या उत्पादनातील तुटीची झळ देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि सामान्य जनतेला कमीतकमी कशी बसेल याचा मार्ग केंद्रातील सरकारने काढायचा असतो. मात्र नेमके येथेच घोडे पेंड खात आहे.

काँग्रेसने शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला पंतप्रधानपदाची संधी दिली नाही…. : PM मोदी यांची थेट टीका

एकीकडे देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आल्याचे सांगत स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि भयंकर महागाईवर नेहमीप्रमाणे मौनीबाब बनून राहायचे. आधीच महागाईचा भर त्यात साखर, धान्य आणि डाळींच्या टंचाईचा मा अशा कोंडीत देशातील जनता सापडण्याची भीती आहे. पण केंद्रातील सत्तापक्षाला त्याची फिकीर कुठे आहे, असा सवाल या लेखात विचारण्यात आला आहे.

साखरेचीही होणार टंचाई

तीन चार वर्षांपूर्वी तुरडाळीच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या डोळ्यांतून पाणी आणलेच होते. या वर्षीही तसेच होण्याची भीती आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या राष्ट्रीय खाद्य मिशननुसार मागील वर्षात देशात 117.87 लाख हेक्टरवर तूरडाळींच्या बियाण्यांची पेरणी झाली होती. यंदा हा आकडा 106.88 लाख हेक्टर इतका घसरला आहे. इतर डाळी आणि कडधान्यांबाबतही यापेक्षा वेगळे चित्र नाही. सगळ्यांचे तोंड गोड करणारी साखरदेखील कडू होण्याची चिन्हे आहेत. देशातील साखर उत्पादनही सलग दुसऱ्या वर्षी घटण्याची शक्यता आहे. यंदा साखर उत्पादन 31.7 दशलक्ष टनांवरच थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळींबरोबरच साखरेचीही टंचाई भासेल अशी शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube