धर्म, देवळे अन् धार्मिक तणाव हीच भाजपाची त्रिसूत्री, 2024 साठी 21 मंदिरांचा कॉरिडॉर; ठाकरे गटाचा हल्लाबोल

धर्म, देवळे अन् धार्मिक तणाव हीच भाजपाची त्रिसूत्री, 2024 साठी 21 मंदिरांचा कॉरिडॉर; ठाकरे गटाचा हल्लाबोल

केंद्रातील भाजप सरकार देशात असंख्य प्रश्न प्रलंबित असताना धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अफूच्या गोळीने ना धर्माचे रक्षण होते ना राष्ट्राचे संरक्षण होते. कोरोनाच्या काळात मंदिरे बंदच होती. डॉक्टर, परिचारिका हेच देवाच्या रुपात वावरत होते. थाळ्या वाजवून, घंटा बडवून कोरोना काही पळाला नाही. 2024 साली पुन्हा एकदा धर्मांध अफूचेच पीक काढण्याची तयारी सुरू आहे. 21 मंदिरांचा वापर त्यासाठी होईल, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या सामना मुखपत्रातील अग्रलेखातून मोदी सरकारवर करण्यात आली आहे.

समृध्दी महामार्गावरील अपघातातून सरकारने धडा घेतला नाही; जयंत पाटलांचं सरकारवर टीकास्त्र

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी धर्म-देवळे-धार्मिक तणाव याच त्रिसूत्रीतून भाजप निवडणुकांना सामोरा जाईल. धर्म ही अफूची गोळी आहे. त्या अफूचा अंमल देशाच्या नसांत पुरेपूर भिनला आहे. 2024 हे धार्मिक वर्ष म्हणून साजरे केले जाईल. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेने त्याची सुरुवात होईल. लोकांना अन्न वस्त्र निवारा, महिलांना संरक्षण प्रतिष्ठा देऊ न शकलेल्या सरकारने धर्माच्या नावाखाली अफूच्या गोळ्या दिल्या व त्याच नशेचा अंमल कायम राहावा म्हणून 13 हजार कोटी रुपये खर्च करून देशात 21 भव्य मंदिरांचे कॉरिडॉर उभारले जात आहे. मंदिरांचा विकास केला हाच मोदींच्या प्रचाराचा मुद्दा राहिल, असं भाकित सामनाच्या लेखात केले आहे.

हेच त्यांचे हिंदुत्व आहे. लोकांना घंटा बडवण्यात, पूजा-अभिषेक, महाआरत्यांत गुंतवून ठेवण्याची कला भाजपने साधली आहे, अशी खोचक टीका केली आहे.फक्त मंदिरांची उभारणी करून देशाची प्रगती होत नाही. शिक्षण, उद्योग, विज्ञान, संरक्षण, उत्पादन, कला, सामाजिक न्याय, सुधारणा यातही देश अग्रेसर असावा. मंदिरे ही मनशांतीसाठी आहेत. विज्ञान हे प्रगतीसाठी आहे. भारत सरकार 21 मंदिरांच्या विकासावर व धार्मिक कॉरिडॉरवर मोठ्या प्रमाणात काम करत आहे. त्यात विज्ञान नाही, असेही ठाकरे गटाने सुनावले आहे.

सांगलीत केसीआर यांची ताकद वाढली! शेतकरी संघटनेचा बडा नेता बीआरएसमध्ये…

2024 च्या निवडणुकांआधी ही सर्व मंदिर तयार होतील. 2014 मध्ये सत्तेवर येण्याआधी मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली. 21 मंदिरांची उभारणी करून भाजपने 140 कोटी लोकांच्या हाती फक्त घंटा बडविण्याचे काम दिले आहे, अशी टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube