.. म्हणून झिरवळ नॉट रिचेबल असतील; उदय सामंतांनी सांगितलं नेमकं कारण
Uday Samant on Narharai Zirval : आज राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. निकाल येण्यास काही तासच शिल्लक राहिलेले असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirval) अचानक नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्या नॉट रिचेबल होण्यावर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचाही उल्लेख केला आहे.
सामंत म्हणाले, निकालानंतर भरपूर घडामोडी घडतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतले काही आमदार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातले काही आमदार उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. याचा प्रचिती तुम्हाला एक ते दोन महिन्यात येईल, असा दावा त्यांनी केला.
Maharashtra political Crisis : सत्तासंर्षाच्या निकाला दरम्यान नरहरी झिरवळ नॉटरिचेबल!
सामंत पुढे म्हणाले, ते का नॉट रिचेबल झाले हे मला कसं कळणार ? पण, काल त्यांनी जे वक्तव्य केलं, न्यायालयाच्या निकालाआधी अशी वक्तव्ये करणे योग्य आहे की अयोग्य. एखाद्या जबाबदार पदावरील व्यक्तीनं असं सांगावं की 16 जणांचे प्रकरण माझ्याकडे असेल तर मी त्यांना अपात्र ठरवेन. शरद पवार यांनी ही गोष्ट कदाचित त्यांच्या लक्षात आणून दिली असेल म्हणून ते नॉट रिचेबल झाले असतील.
दरम्यान, राज्याच्या विधान सभेचे उपसभापती नरहरी झिरवळ नॉटरिचेबल झाले आहेत. त्यांचे दोन्ही फोन बंद झाले आहेत. तर ते गावाकडच्या घरी देखील नसल्याचं सांगण्यात येत आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाच्या दिवशी विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष झिरवळ ‘नॉट रिचेबल’ त्यामुळे राज्याच्या राजकारणात सत्तासंर्षाच्या निकाला दरम्यान आणखी काय खळबळजनक घटना घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Anil Parab : शिंदे गटाचे फक्त 16 नाही, तर तब्बल 39 आमदार अपात्र होणार
सत्तासंघर्ष हा विधीमंडळातील मुद्दा असल्याने सर्वोच्च न्यायालय याचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा असा निकाल देऊ शकत. त्यामुळे तेव्हा जे अध्यक्ष होते ते म्हणजे नरहरी झिरवळ यांच्याकडे या प्रकरणावर निर्णय देण्याची जबाबदारी येऊ शकते असं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचं असं नॉटरिचेबल होणं अत्यंत खळबळजनक मानलं जात आहे.