Irshalwadi : इर्शाळवाडीत बचावकार्याला पुन्हा सुरुवात; आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

Irshalwadi : इर्शाळवाडीत बचावकार्याला पुन्हा सुरुवात; आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

Irshalwadi Landslide Rescue Operation : खराब हवामानामुळे इर्शाळवाडीत थांबविण्यात आलेले बचावकार्य आज पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या दुर्घचटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. काल दुपारपर्यंत मृतांचा आकडा 12 होता. अजूनही 100 पेक्षा जास्त लोक या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येथे मुक्कामी असून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

Irshalwadi landslide : झोपड्या तोडणारे वनविभागाच आता आरोपाच्या पिंजऱ्यात

या परिसरात सतत पाऊस पडतो आहे. हवामान खराब आहे. मातीच्या पायवाटा असल्याने प्रचंड चिखल झाला आहे. या सगळ्या अडचणींवर मात करत बचावकार्य सुरू होते. पण, काल हवामान अधिकच खराब झाल्याने बचावकार्य थांबवण्यात आले होते. आता पुन्हा सकाळीच लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की आतापर्यंत 103 जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती आहे. त्यामुळे बचावकार्य सुरुच ठेवले जाणार आहे. खराब हवामानामुळे अडचणी येत आहेत. एनडीआरएफच्या बचाव पथकासह पनवेल महापालिकेचे बचाव पथक, सिडकोचे मजूर आणि स्थानिक ट्रेकर्सचा एक गट या कामात गुंतला आहे.

रायगडात आजही धो धो बरसणार

कोकण, विदर्भासह काही जिल्ह्यांत तुफान पाऊस सुरू आहे. मुंबई शेजारच्या ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना हवामान खात्याने आज (21 जुलै) पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता ठाणे, रायगड, पालघर येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

शिंदे इर्शाळवाडीत मुक्कामी, पवार-फडणवीसांना दिली मोठी जबाबदारी

दरम्यान, काल सकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री शिंदे इर्शाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते. त्यानंतर दीड तास पायपीट करत इर्शाळवाडीत दु्र्घटनाग्रस्त गावाला भेट दिली. मुख्यमंत्री स्वतः बचावकार्यात सहभागी झाले. याच काळात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे तेथील कामकाजाची जबाबदारी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube