‘आम्ही घरात होतो, अचानक आवाज झाला बाहेर येऊन पाहिलं तर’.. महिलेने सांगितला थरकाप उडविणारा प्रसंग

Khalapur Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात मुसळधार पावसाने रौद्ररुप दाखवलं. या पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झाला. आता दिवस उजाडल्यावर या भयानक घटनेचं मन विषण्ण करणारं खरं रुप समोर आलं आहे. लोकांचे रडणं, ओरडणं आणि आपल्या आप्तस्वकियांना शोधण्यासाठी सुरू असलेली धडपडच दिसते आहे. या घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून 22 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.
Khalapur Landslide : मोठी दुर्घटना! खालापूरमध्ये गावावरच दरड कोसळली, १०० जण ढिगाऱ्याखाली अडकले
राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून या पावसाने जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. आता रायगड जिल्ह्यात एक भयंकर दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील खालाापूर तहसील क्षेत्रातील इरसालवाडी या गावात दरड कोसळून अनेक कुटुंबे मलब्याखाली अडकून पडली आहेत. या दरडेखाली शंभरपेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 22 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
महिला म्हणाली, ‘बुधवारी रात्री मोठा पाऊस सुरू होता. वाराही सुटला होता. आम्ही घरातच होतो. अचानक बाहेर काहीतरी मोठा आवाज झाला. आम्हाला वाटलं की एखादं घरच पडलं आहे. पण, बाहेर येऊन पाहिलं तर अख्खं गावच ढिगाऱ्याखाली दबलं गेलं होतं. आमच्या शेजारील काही घरेही दबली गेली होती. त्यानंतर आम्ही आरडाओरडा करू लागलो. घरातील सदस्यांना घेऊन पटकन बाहेर पडलो.’
मुलीला शोधण्यासाठी वडिलांची धावपळ
या घटनेमुळे नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाचा भाऊ तर कुणाचं कुटुंब या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं. एक बाप त्याच्या मुलीचा शोध घेत आहे. बदलापूर येथून मुलीला शोधायला आलेल्या बापाचं हे उत्तर डोळ्यांच्या कडा पाणावणारं होतं.
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde arrives at the site of the landslide in Irshalwadi village of Khalapur tehsil of Raigad district.
According to the Raigad police, four people have died and three others have been injured. Rescue operation is underway. pic.twitter.com/nu087axCrz
— ANI (@ANI) July 20, 2023
मुख्यमंत्री, पालकमंत्री घटनास्थळी दाखल
या गावात जवळपास 40 घरे आहेत. ही सर्व घरे दरडीखाली आली आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले आहेत. मंत्री अदिती तटकरे यांनी प्रशासनाला, मदतकार्य करणाऱ्या पथकांना महत्वाच्या सूचना दिल्या. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरसालवाडी या गावात 40 ते 50 घरे आहेत. जवळपास तीस ते चाळीस लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.