Rain Alert : तुफान बरसणाऱ्या पावसाला ब्रेक! जाणून घ्या, हवामान विभागाचा आजचा अंदाज

Rain Alert : तुफान बरसणाऱ्या पावसाला ब्रेक! जाणून घ्या, हवामान विभागाचा आजचा अंदाज

Maharashtra Rain Update : राज्यातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून थैमान घालत असलेला पाऊस आता कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस कोकण घाटमाथा, विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीचे दहा दिवस पावसाची विश्रांतीच राहिल. पालघर, ठाणे, घोडबंदर, नाशिक, नंदूरबार, पुणे, साताऱ्यातील घाट भागात पुढील दोन ते तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. तसेच पुढील 24 तासात मराठवाड्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रायगड आणि रत्नागिरी तसे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे. या भागात आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे दिसते. राज्यात काही ठराविक जिल्ह्यांतच जोरदार पाऊस झाला. अन्य ठिकाणी जुलै महिना संपला तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पेरण्याही संकटात सापडल्या आहेत.

विदर्भातील 9 जिल्ह्यात पावसाची सरासरी

विदर्भात अनेक ठिकाणी 1 जून ते 27 जुलैपर्यंत 495.8 मिमी पाऊस झाला आहे. या काळात 446 मिमी पावसाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, अपेक्षेपेक्षा सरासरी 11 टक्के जास्त पाऊस झाला आहे. यामध्ये यवतमाळ 36 तर भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 25 टक्के जास्त पाऊस झाला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube