‘त्या’ स्टुडिओंचे पाडकाम जोरात, सोमय्यांनीही मारला हातोडा !

‘त्या’ स्टुडिओंचे पाडकाम जोरात, सोमय्यांनीही मारला हातोडा !

Kirit Somaiya : मढ मालाड येथील एक हजार कोटींचे अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे आदेश काल नॅशनल ग्रीन ट्रिब्युलने दिला होता. त्यानुसार आज या आदेशाची अंमलबजवणी करण्यात येऊन या स्टुडिओंचे पाडकाम सुरू करण्यात आले. स्टुडिओ पाडले जात असताना तक्रार करणारे भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) देखील येथे उपस्थित होते. त्यांनीही या पाडकामाची पाहणी करत हातात प्रतिकात्मक हातोडा घेत या बांधकामावर मारला. हा क्षण येथे उपस्थित असणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कॅमेऱ्यात टिपला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘या स्टुडिओद्वारे 400 कोटींचा महसूल मिळत होता. यातील 100 कोटी रुपये दर आठवड्याला वाटप करण्यात जात होते. अनधिकृत्या हे समुद्रात बांधले गेले आहे. हे कृत्य अनधिकृत आहे असे आज सिद्ध झाले.’

भ्रष्टाचाऱ्यांना शुध्द करुन भाजप त्यांना आपल्या पक्षात घेते…राऊतांची टीका

‘उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचे प्रतिकाचे तुकडे झाले आहेत. आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने ही जबाबदारी स्वीकारली. माझी तक्रार होती म्हणून मी मॉनिटर करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. अजून कारवाई होणार असून त्या कारवाईत खूप काही बाहेर येणार आहे’, असा इशारा सोमय्या यांनी दिला.

मढ-मालाड येथील एक हजार कोटींचे डझनभर अनधिकृत स्टुडीओ पाडण्याचा आदेश National Green Tribunal (NGT) ने दिला होता. काँग्रेस नेते असलम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्या कृपेने 2021 मध्ये डझनभर अनधिकृत स्टुडीओ बांधण्यात आले होते. आम्ही न्यायालयात गेलो. आजपासून स्टुडीओ तोडण्याचे काम सुरु होणार आहे, अशी माहिती सोमय्या यांनी काल एक व्हिडीओ ट्विट करत दिली होती. त्यानंतर आज प्रत्यक्षात या कामाला सुरुवात करण्यात आली.

ट्विटरचा लोगो पुन्हा बदलला, श्वानाच्या जागी आता…

दरम्यान, मढ मालाड येथील या स्टुडिओंच्या घोटाळ्या प्रकरणात तत्कालीन महाविकास आघाडी  सरकारमधील मंत्री अस्लम शेख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची  मागणी सोमय्या यांनी सात महिन्यांपूर्वी केली होती. तसेच सरकारने मुंबई पालिकेचे अधिकारी व पर्यावरण अधिकारी यांचीही चौकशी करावी  अशी त्यांची मागणी होती. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते.

आदित्य ठाकरेचींच मदत

आज न्यायालयाच्या आदेशानेच हे अनधिकृत स्टुडिओ पाडले जात आहेत. हे समुद्रात केलेले बांधकाम अनधिकृत असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, अस्लम शेख आणि आ.  आदित्य ठाकरेच या बांधकामासाठी मदत करत होते असा आरोपे सोमय्या यांनी यावेळी केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube