एकनाथ शिंदेच फक्त डॉक्टर नाहीत; ‘या’ नेत्यांनाही मिळालीय डॉक्टरेट !

एकनाथ शिंदेच फक्त डॉक्टर नाहीत; ‘या’ नेत्यांनाही मिळालीय डॉक्टरेट !

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाने डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले. शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक, वैद्यकिय आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना ही पदवी दिली. त्यामुळे आता शिंदे यांच्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी लागणार आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच राजकीय व्यक्ती नाहीत ज्यांना ही पदवी मिळाली आहे. शिंदे यांच्या आधी अनेक राजकीय नेत्यांना या पदवीने गौरविण्यात आले आहे.

संजय राऊत म्हणत होते ते हेच दंगे का ? ; सोमय्यांकडून राऊत टार्गेट

राज्यातील आणि केंद्रातील काही महत्वाच्या नेत्यांना विद्यापीठांनी ही पदवी दिली आहे. ज्या विद्यापीठाच्या नामांतरासाठी सत्ता गमावली त्याच विद्यापीठाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना डी. लिट पदवीने सन्मानित केले होते. नोव्हेंबर 2022 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पवार यांना ही पदवी प्रदान केली होती.

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ही पदवी देण्यात आली. शरद पवार यांच्यासह याच सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना देखील डी. लिट पदवीने सन्मानित करण्यात आले होते.

Karnataka Election : निवडणुकांपूर्वीच भाजपला धक्का; दिग्गज नेत्याची रणधूमाळीतून माघार!

भारती विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या विद्यापीठांनीही शरद पवार यांना डी. लिट पदवी दिली आहे. याच वर्षातील फेब्रुवारी महिन्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मंत्री गडकरी यांनी डी. लिट पदवी प्रदान करत सन्मानित केले होते.

याआधी डी. वाय पाटील विद्यापीठाने माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ही पदवी दिली होती. मनोहर जोशी यांनी त्यांच्या कार्यकाळात राजकीय क्षेत्रात जे योगदान दिले त्याबद्दल त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube