Unseasonal Rain : पुढील 3 ते 4 दिवस वादळी पाऊस; पुणे, सातारा, नाशिकमध्ये गारपीट, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Untitle (13)

Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचं आगमन झाल्याने राज्यातील अनेक भागांत पाऊस बरसत (Unseasnable Rain ) असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता पुढील तीन ते चार दिवसांतही वादळी पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळमध्ये गारपीट होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीयं. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पिक गेलं आहे.

नगरसेवक सनी निम्हण यांनी केलेल्या राजभवन रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मागणीला अतिरिक्त आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये गारपिटीची शक्यता असून मराठवाड्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीयं. तर
संध्याकाळच्या दरम्यान ४० ते ५० किमी प्रति ताशी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलायं.तसेच मध्य महाराष्ट्रात देखील सर्वत्र वादळी वाऱ्यांसह पाऊस, काही ठिकाणी ५० ते ६० किमी वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीयं.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; संघटन सरचिटणीसपदी प्रविणकुमार बिरादार

पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला असून कोकणात देखील काही जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज आहे तर मुंबई, उपनगरांमध्ये देखील आज हलक्या सरींची शक्यता आहे.29 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतरत काल 30 मार्च रोजी विदर्भातील बुलढाणा, चिखली मोताळा, खामगाव, संग्रामपूर भागात पावसाने हजेरी लावलीयं. या पावसामुळे शेतात काढणीला आलेलं बऱ्यापैकी पिक शेतकऱ्याच्या हातातून गेल्याचं चित्र आहे. काढणीला आलेला कांदा संपूर्ण भिजल्याने आता या मालाला भाव मिळेल की नाही? या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहे. काल झालेल्या पावसामुळे विशेषत: कांदा, केळी, गहू, ज्वारी, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

22 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा Gmail ID; सुंदर पिचाईंची मोठी घोषणा

follow us