‘गौतमीने लावणी बिघडवली, इंदुरीकर महाराजांना लोक नावं ठेवतात’; आत्मपरीक्षण करा !

‘गौतमीने लावणी बिघडवली, इंदुरीकर महाराजांना लोक नावं ठेवतात’; आत्मपरीक्षण करा !

Gautami Patil vs Indurikar Maharaj : काही दिवसांपासून गौतमी पाटील हीचे नाव राज्यभरात चर्चेत आहे. तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की प्रचंड गर्दी होते. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटील संदर्भात एक वक्तव्य केले होते. गौतमीनेही प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता ज्येष्ठ  साहित्यिक सदानंद मोरे (Sadanand More)यांनी या दोघांनाही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.

‘गौतमी पाटील हीने लावणीची संस्कृती बिघडवली तर इंदुरीकर महाराज यांना त्यांच्याच वारकरी संप्रदायातील लोक नावे ठेवतात. त्यामुळे या दोघांनीही आता आत्मपरीक्षण करावे’, असे मोरे यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यात वादविवाद चांगलाच रंगला होता.

Devendra Fadanvis : सकाळी नऊचं बंद केलं तर… पत्रकार परिषदेवरून फडणवीसांचा राऊतांना टोला

काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज ?

‘गौतमी पाटीलच्या तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते. आम्हाला मात्र टाळ वाजवूनही काहीच मिळत नाही. आम्ही पाच हजार रुपये जरी मागितले तरी पैशांचा बाजार मांडला असा आरोप होतो. गाण्यांच्या कार्यक्रमात हाणामारी होते, काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिलं जात नाही’, अशा शब्दांत इंदुरीकर महाराजांनी खंत व्यक्त केली होती.

इंदुरीकर महाराजांच्या निशाण्यावर गौतमी पाटील

गौतमीने दिले स्पष्टीकरण 

इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यावर गौतमीने पाटीलनेही स्पष्टीकरण दिले होते. ‘ते महाराज आहेत. मी त्यांच्याबद्दल काय बोलणार ?, इंदुरीकर महाराजांचा गैरसमज झाला आहे. इंदुरीकर महाराज सांगतात तेवढं माझं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी देखील ध्यानात घ्यावं. मी तीन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. तीन गाण्यासाठी तीन लाख कोणीही देणार नाही. आमच्या टीममध्ये 11 मुली आहेत. आमची एकूण 20 जणांची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो.’ पण महाराज सांगतात तेवढं घेत नसल्याचे गौतमी पाटील हीने स्पष्ट केले होते .

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube