Maharashtra Weather Alert : सावधान! राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट; अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert : विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात वाढ होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे हाल देखील होत आहे.
Maharashtra Weather Alert : विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात वाढ होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे हाल देखील होत आहे. तर आता येणाऱ्या काही दिवस राज्यात उष्णेतेची लाट असणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 17 एप्रिल हा दिवस एप्रिल महिन्याचा सर्वात उष्ण दिवस असणार आहे. तर 18 आणि 19 एप्रिल रोजी देखील राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 16 एप्रिल रोजी सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यात उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे. तर 17 एप्रिल रोजी अहिल्यानगर, जळगाव, अमरावती, अकोला, जालना, बीड, बुलढाणा, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, नांदेड, यवतमाळ, हिंगोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट असू शकते.
तर 18 एप्रिल रोजी संभाजीनगर, जळगाव, जालना, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा,यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. उष्णतेची लाट आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे खालील उपाय पाळा
शरीर हायड्रेट ठेवा
दिवसभर भरपूर पाणी प्या
लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे पेय घ्या
कॅफीन व अल्कोहोल टाळा
हलके कपडे निवडा
हलके, सैल आणि फिकट रंगाचे कपडे घाला
भारतीय संघात एन्ट्री करणार वैभव सूर्यवंशी; ‘या’ खेळाडूची घेणार जागा
उन्हापासून संरक्षण
शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळा.
बाहेर जाताना टोपी
सनग्लासेस
छत्री वापरा आणि सनस्क्रीन लावा.