राज्याचा मुख्य सचिव कोण ?; शिंदे-फडणवीसांच्या मर्जीतला ‘हा’ अधिकारी चर्चेत

राज्याचा मुख्य सचिव कोण ?; शिंदे-फडणवीसांच्या मर्जीतला ‘हा’ अधिकारी चर्चेत

Maharashtra : राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव येत्या 28 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर मुख्य सचिवपदी कुणाला संधी मिळणार असा प्रश्न चर्चेत आहे. त्यात सध्याच्या घडीला मनोज सौनिक, सुजाता सौनिक आणि डॉ. नितीन करीर या तिघांची नावे आघाडीवर आहेत. या तिघांपैकी एका जणाची मुख्य सचिव म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या अनेक अविश्वसनीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्चीही डळमळीत झाली आहे. या घडामोडी पाहता मनुकुमार श्रीवास्तव यांना सेवानिवृत्तीनंतर मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता होती. मात्र, त्यांनी मुदतवाढ मागितली नाही. त्यांनी पाच वर्षे मुदतीच्या सेवा आयुक्तपदासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांचा या पदासाठी निवड झाली. श्रीवास्तव यांच्या निवृत्तीनंतर 29 एप्रिलपासून राज्याचे मुख्य सचिव पद रिक्त होणार आहे.

Gulabrao Patil : संजय राऊत चुकीचे कंडक्टर; पुढे रेड झोन, उद्धव साहेबांना सावध केलं होतं

मुख्य सचिवांची निवड करताना सेवाज्येष्ठतेला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. या फॉर्म्युल्याचा विचार केला तर सध्या मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर, सुजाता सौनिक या तिघांपैकी एकाला संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मनोज सौनिक आणि सुजाता सौनिक हे दोघे पती पत्नी महाराष्ट्राबाहेरच्या कॅडरचे अधिकारी आहेत. या दोघांनी अतिरिक्त मुख्य सचिव पदावर राहून विविध विभागांची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे.

Barsu Refinery : टोपी उड सकती है! फडणवीसांनी आम्हाला डिवचू नये राऊतांचा हल्लाबोल

डॉ. नितीन करीर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली अनेक वर्षे असलेल्या नगरविकास खात्याची जबाबदारी सांभाळली आहे. करीर हे मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील समजले जातात. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता डॉ. करीर यांची सचिवपदी नियुक्ती होण्याची जास्त शक्यता असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे करीर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही विश्वासातील अधिकारी म्हणून ओळखले जातात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube