धक्कादायक! सांगलीत महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे झाला आहे. या घटनेने जत तालुक्यात खळबळ माजली आहे.
महावितरण कर्मचाऱ्याची घराबाहरेच गोळ्या झाडून (Fire) हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सागंलीत ही घटना घडली आहे. हत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, अनैतिक संबधातून हत्या झाल्याच संशय व्यक्त केला जात आहे. हल्लेखोर कोण होते याचा पोलीस तपास करत आहेत.
सांगली जिल्ह्यातील संख येथे ही घचना घडली आहे. संख येथील महावितरण वसुली कर्मचाऱ्याची त्याच्या राहत्या घराच्या परिसरात गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. संतोष उर्फ कुमार बिराजदार असे आहे. संख नजीक असणाऱ्य पांडोझरी गावाच्या हद्दीत मध्यरात्री अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; खून कि आत्महत्या?
या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे झाला आहे. या घटनेने जत तालुक्यात खळबळ माजली आहे. या घटनेची उमदी पोलिसांत नोंद झाली आहे. या प्रकरणी उमदी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, हे अद्याप स्पष्ट नसून अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची चर्चा सुरू असून अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.
पुण्यात सुनेचा खून करून फरार झालेल्या आरोपी सासर्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव मधील मेहरून परिसरातून अटक केली आहे. भानुदास भास्कर चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी सासऱ्याचे नाव आहे. 2 मे रोजी पुण्यातील रायकर मळा परिसरात सून स्वाती चौधरी च्या डोक्यावर वार करून हत्या करत आरोपी सासरा भानुदास चौधरी हा फरार झाला होता. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस स्टेशन मध्ये भानुदास चौधरी वर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातून भानुदास चौधरीला अटक करत पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पुण्याच्या खेड तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. केवळ सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी एका ३६ वर्षीय नराधमाने ८० वर्षांच्या वृद्धेचा गळा दाबून खून केला आहे. इतक्यावरच न थांबता, या नराधमाने पुरावे नष्ट करण्यासाठी आजींचा मृतदेह गोणीत भरला आणि तो चक्क भामा नदीच्या पात्रात फेकून दिला. करंजविहीरे परिसरात घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
मयत सिंधुबाई मरगज या २ मे रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे वस्तीवरील रस्त्याने जात असताना, त्यांच्याच गावातील कैलास मरगज याने त्यांच्यावर झडप घातली. दागिन्यांच्या लुटीसाठी त्याने या माऊलीचा जीव घेतला. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्यावर ””भारतीय न्याय संहिता”” म्हणजेच BNS च्या नवीन कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र, एका ज्येष्ठ नागरिकेची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाल्यामुळे आता परिसरातून संताप आणि भीती व्यक्त केली जात आहे.