मनोज जरांगेंकडून राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा; कुणबी नोंदींवर मराठा बांधवांशी चर्चा करणार
Manoj Jarange मराठा आंदोलक मनोज जरांगे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 7 डिसेंबरपासून त्यांचा हा दौरा सुरू होणार आहे.
Manoj Jarange announces state-wide tour discussions with fellow Marathas regarding Kunbi records : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 7 डिसेंबरपासून त्यांचा हा दौरा सुरू होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जरांगे महाराष्ट्रभर सक्रिय होणार आहेत.
मराठवाड्यातील भाजपचा बडा नेता नॉट रिचेबल, पक्षावर नाराज की वेगळंच झेंगट अंगलट ?
प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांना त्या-त्या जिल्ह्याच्या ठिकाणी बोलवणार आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या पण त्यांच्या कुणबी म्हणून नोंद होत नाही. अशा बांधवांशी संवाद साधणार आणि विविध अडचणी समस्या बाबत प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठा बांधवांशी चर्चा करणार असं यावेळी जरांगे यांनी सांगितलं.
या दौऱ्या दरम्यान जरांगे प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस पूर्ण वेळ देणार असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन कुणबी नोंदी संदर्भात काय अडचणी आहे आणि त्या अडचणी संदर्भात तेथील मराठा बांधवांशी दिवसभर चर्चा करणार आहेत. तसेच नेमकं लोकांना आरक्षणासंदर्भात काय अडचणी येतात त्या संदर्भात लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. या दौऱ्याचे ते 1 डिसेंबर पासून नियोजन करणार आहेत.