सोनम वांगचूक यांना जसं उचलून नेलं, तसं जरांगेंसोबत सरकारने चुकूनही करु नये; अभिजीत दिपकेंचा इशारा
Abhijeet Dipke Meets Manoj Jarange जरांगेंच्या उपोषणाचा 14वा दिवस असून अभिजीत दिपकेंनी अंतरवालीत जरांगेंची भेट घेत त्यांची विचारपूस केली.
Abhijeet Dipke Meets Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) उपोषणाचा आजचा चौदावा दिवस आहे. जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भुमिका त्यांनी मांडली आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अशातच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipake) यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवला.
पुण्यात तब्बल 4 ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त, गणेशोत्सवाआधी FDA ची बुधवार पेठेत मोठी कारवाई
जरांगेंच्या भेटीनंतर अभिजीत दिपकेंनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. समाजासाठी आंदोलन करणाऱ्या व्यक्तींशी सरकार चर्चा करायला तयार नाही, अशी टीका त्यांनी केली. ज्यांना आपण निवडून दिलं ते लोकांना सोडून बाकी सर्वांशी चर्चा करतात. जे लोकं समाजासाठी झटतात. त्यांच्याशी सरकार चर्चा करायलाही तयार नाही. मग सरकार चर्चा करणार कोणासोबत? “का फक्त कॉमेडीयनला बोलावून त्याला बिस्किटं खाऊ घालणार आणि मनोज जरांगेंसारख्या समाजसेवकांना मरण्यासाठी सोडून देणार?” असा सवाल दिपकेंनी केला. तसेच सरकारने आंदोलनाची आणि जरांगेंच्या प्रकृतीची गंभीर दखल घेऊन तातडीने त्यांच्याशी संवाद साधावा, अशी मागणी त्यांनी केली.
मोठी बातमी, मनोज जरांगेंविरोधात ED कडे तक्रार; 1000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अंतरवालीत यावे
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः अंतरवाली सराटीत यावे आणि मनोज जरांगे यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात, असे आवाहन दिपके यांनी केले. जरांगे हे स्वतःसाठी कोणतीही मागणी करत नसून मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी आरक्षणाची मागणी करत आहेत, असा दावा त्यांनी केला.
सरकारच्या अपयशामुळे जरांगेंना उपोषणाची वेळ?
मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला का बसावे लागले, याबाबतही अभिजीत दिपके यांनी सरकारला लक्ष्य केले. मराठा समाजाला शिक्षण, रोजगार आणि इतर सवलती पुरेशा प्रमाणात मिळाल्या असत्या, तर जरांगेंना आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याची वेळ आली नसती, असे ते म्हणाले.
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 14 दिवस; उद्या घेणार मोठा निर्णय
मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारने वेळेत लक्ष दिले नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, यात सरकारचे कुठेतरी अपयश असल्याचे दिसून येते, अशी टीका त्यांनी केली.
मनोज जरांगेंना हात लावू नका; दिपकेंचा इशारा
यावेळी दिपके यांनी सरकारला आंदोलन हाताळताना संयम बाळगण्याचा इशाराही दिला. “जंतरमंतरवर उपोषण करणाऱ्या सोनम वांगचूक यांना जसं उचलून नेलं होतं, तसं सरकारने मनोज जरांगेंसोबत चुकूनही करु नये, त्यांना कुणी हात लावला तर संपुर्ण महाराष्ट्र अंतरवालीत येईल.” असा इशारा दिपकेंनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात नवी रोजगाराची संधी
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गेल्या चार दिवसापासून सरकारच्या शिष्टमंडळाची कुठलीही चर्चा नाही. उद्या मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीत 12 वाजता राज्यव्यापी निर्णायक बैठक होणार आहे. अंतरवाली सराटीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला धडक देऊ असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला होता त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीत मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.