अखेर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश, आंदोलक गावाच्या दिशेने निघाले, पाटील उपचारांसाठी रुग्णालयात

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला मोठं यश मिळालं (Jarange) असून मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितलं. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलं. तसेच सातारा गॅझेटच्या मागणीवर जलदगतीने निर्णय घेणार असल्याचंही उपसमितीने मान्य केलं.
मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषण सुरु केलं होतं. या आंदोलनाला यश आले आहे. जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं आहे. ते आता रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. सरकारने जारी केलेला हा जीआर हैदराबाद गॅझेटसंदर्भात आहे. जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन 2001 च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. 23 व त्याअंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत.
सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं, मराठा आंदोलनाला मोठ यश