धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; जरांगेंचे गंभीर आरोप; काय-काय ठरलेलं सगळं सांगितलं
Manoj Jarange Patil : मराठा समालाजा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी बीड जिल्ह्यात 2.5 कोटी रुपयांची डील
Manoj Jarange Patil : मराठा समालाजा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी बीड जिल्ह्यात 2.5 कोटी रुपयांची डील झाली होती असा धक्कादायक खुलासा झाल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु असून या डीलमागे बीड जिल्ह्यातील एक मोठा नेता होता असं सांगण्यात येत आहे. तर आता या संपूर्ण प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की, आज मराठा समाजाला एक शब्द देतो की, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शांत राहा. मी मेल्यावर काय करयचा ते करा. सगळा महाराष्ट्र हसला पाहिजेत. आत्ता सुखाचे दिवस आले आहे . आत्ता सुखाचे दिवस आले आहे. असल्या वृत्तीचा नायनाट करावाच लागेल. सर्वांनी विषय ताकदीने लावून धरा तरच वृत्तीचा नायनाट होणार. करणाऱ्यापेक्षा करुन घेणारा अधिक जबाबदार असतो. एका मोठ्या नेत्याने कट रचला होता मात्र मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठा समाजाला शांत राहण्याचं आवाहन केले.
जनतेच्या कोर्टात जनतेच्या प्रशासनात खरं काय सर्वांना माहिती आहे. बीडच्या एका कार्यकर्ता दोघांपैकी एका आरोपीकडे गेला तिथून सुरुवात झाली या कटाची सुरुवात झाली. सुरुवातीला माझ्या विरोधात खोट्या रेकॉर्डिंग, खोटे व्हिडिओ बनवण्याचा डाव होता त्यानंतर गोळ्या देऊन घातपात करण्याच्या विचारात होते असा खुलासा देखील जरांगे यांनी केला यावेळी केला.
तर राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांनी माझी सुपारी दिली होता असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
धनंजय मुंडेंकडून माझ्याविरोधात षडयंत्र करण्यात आले. माझ्या हत्येच्या कट रचण्यासाठी बीडमध्ये गुप्त बैठका करण्यात आले असा दावा देखील यावेळी जरांगे पाटील यांनी केला. तसेच धनंजय मुंडे यांनी आरोपींची सह्याद्री रेस्ट हाऊससमोर भाऊबीजेच्या दिवशी भेट घेतली. मला गाडी द्या आम्ही आम्ही गाडीने ठोकतो असं आरोपी म्हणाले. तर माझ्याकडे जुनी गाडी आहे बाहेरच्या पार्सिंगची ती घ्या असं मुंडे म्हणाले असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला.
कंपनीला टाळे अन् पोलिसांकडून शोध सुरु; शीतल तेजवानीचा संशयास्पद भूतकाळ समोर
तर बीडमध्ये प्रत्येकाच्या गाडीत सीटखाली मोबाईल आहे. कोण कोणाविषयी काय बोलतो हे मोबाईलवरुन ऐकतात असा दावा देखील जरांगे यांनी यावेळा केला.
