Video : आता नाव घेऊन सांगणार पाडा म्हणून…; शेवटच्या टप्प्यापूर्वी जरांगेंचा एल्गार
छ.संभाजीनगर : यावेळेस फक्त पाडा म्हणलो नाव घेतलं नाही मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये नाव घेऊन पाडा म्हणून सांगणार असा थेट इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी दिला आहे. राजकारणात मराठ्यांची भीती आहे हे खरे असून, पाचव्या टप्प्यातसुद्धा भीती ठेवा असेही जरांगेंनी म्हटले आहे. (Manoj Jarange On Vidhansabhe Election)
Video : मविआ राज्यात 48 पैकी 46 जागा जिंकण्याची हवा; खरगेंनी मुंबईत येऊन दावा ठोकला
सविस्तर प्लॅन 4 जूनला सांगणार
येत्या 4 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असून, आम्हाला राजराणात यायचं नाही पण आरक्षण दिले नाही तर, सर्व समाज विधानसभेत पूर्ण ताकदीने उतरू असा इशारा जरांगेंनी राजकारण्यांना दिला आहे. आंदोलनाची पुढची दिशा 4 जूनला सविस्तर सांगितला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
काय करतात त्याकडे लक्ष ठेवा
जात लक्षात ठेवा निवडून येण्यासाठी काहीही करू नका. आपल्यावर झालेला अन्याय , विसरू नका. एकत्र या एका ताकदीने पाडा.. एका ताकदीने निवडून आणा, असे जरांगे म्हणाले. धनंजय मुंडे जातीय वाद करत नाही असा मला विश्वास होता. पण आता तेपण जातीयवाद करू लागले आहेl असं वाटत आहे. त्यामुळे राजकीय नेते काय करतात त्याकडे शांत राहून लक्ष ठेवा असेही जरागेंनी समाजाला सांगितले. माझ्या नावाचा काही जण फायदा घेत असल्याचेही ते म्हणाले.
जालना : दानवेंचा षटकार की काळेंचा विजय?; जरांगेंची भोकरदन सभा ठरणार ‘टर्निग पॉइंट’
माझा कुणालाही पाठिंबा नाही
यावेळी जरांगेंनी लोकसभा निवडणुकीत कुणालाही पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट केले. तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मत द्या. नाशिकमध्ये पण मी कुणालाच पाठिंबा दिलेला नसून मुद्दाम कुणातरी अफवा पसरवत आहेत. आपल्या लेकरांच्या बाजूने उभे राहा. आपल्या हिताचे कोण बोलतो त्याच्या पाठीशी उभे राहा असेही जरांगे म्हणाले.
मग होऊ द्या 7 ते 8 उपमुख्यमंत्री
राज्यात सगळ्या जातींना सोबत घेत 288 जागा लढवणार अशी घोषणाच मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 4-5 जाती एकत्रित आल्या तर 100 टक्के सत्ता आणेन. मग होऊ द्या 7-8 उपमुख्यमंत्री, एक मुस्लीम, एक धनगर, एक दलित, लिंगायत समाज सगळ्यांचा एक एक उपमुख्यमंत्री करू. शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्री झाला तर दणादण शेतकऱ्यांची कामे करतील. मी मैदानात उतरलो, तर गोरगरिबांच्या हाती सत्ता द्या, निवडून येणारे कसे काम करणार नाहीत ते मी बघतो असं आवाहनही जरांगेंनी जनतेला केले.