मराठवाडा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळेंना धक्का

मराठवाडा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळेंना धक्का

औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांचे विश्वासू समजले जाणारे सुभाष भारतीय यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सुभाष भारतीय ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील एक महत्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना निवडणुकीत धक्का बसणार असल्याचं बोललं जातंय.

सुभाष भारतीय हे भारतीय जनता पक्षाचे आमदार मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये गंगाखेड इथे प्रवेश केल्याची असल्याची माहिती समोर आलीय. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संतोष मुरकुटे, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विठ्ठलाराव रबदडे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर सुभाष भारतीय यांनी भाजप प्रवेश केल्याने त्यांचे आमदार विक्रम काळेंना हादरा बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुभाष भारतीय यांचा ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन संघटनेच्या माध्यामातून चांगला जनसंपर्क आहे. त्यांनी पदवीधरांसह शिक्षकांच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहुन अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात सुभाष भारतीय यांना माननारा एक वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा आहे.

मराठवाडा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जातयं. मराठवाडा मतदारसंघात महाविकास आघाडी सरकारकडून विक्रम काळे तर भारतीय जनता पक्षाकडून किरण पाटील यांनी उमेदवारी देण्यात आलीय. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रदिप साळुंखे यांनीही आपला उमेदवारीचा अर्ज मागे न घेतल्याने विक्रम काळेंविरोधात प्रदिप साळुंखे यांनी रणशिंग फुंकल्याची परिस्थिती दिसून येतेयं.

अशातच निकटवर्तीय सुभाष भारतीय यांनी भाजपात प्रवेश केल्याने मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडुन येण्यासाठी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, आता सुभाष भारतीयांच्या प्रवेशानंतर आणखी कोणी निकटवर्तीय दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणार का? याचं अनुकरण काळे यांना करणं गरजेचं आहे. त्यासोबतच विक्रम काळे येणाऱ्या निवडणुकीत या आव्हानाला कसं सामोरं जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज्यातील पाच जागांपैकी नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरल्याने या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमदेवाराने तर दुसऱ्या औरंगाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बंडखोरी केल्याने दोन्ही मतदारसंघात बंडखोरी झाल्याचं दिसून आलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube