Teacher Constituency Election : मराठवाड्यातही भाजपला धक्काच! महाविकास आघाडीच्या विक्रम काळेंचा ‘विक्रम’

Teacher Constituency Election : मराठवाड्यातही भाजपला धक्काच! महाविकास आघाडीच्या विक्रम काळेंचा ‘विक्रम’

औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे(Vikram Kale) यांचा विजय झाला आहे. विक्रम काळे यांना 20 हजार 195 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार किरण पाटील(Kiran Kale) यांचा पराभव झाला आहे. औरंगाबाद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विक्रम काळेंचा सलग चौथ्यांदा विजय झाला आहे.

महाविकास आघाडीचे विजयी उमदेवार विक्रम काळे यांना 20 हजार 195 मते मिळाली असून भाजपचे किरण पाटील यांना 13 हजार 570 मते मिळाली आहेत. अत्यंत चुरशीची समजली जाणारी ही लढत अखेर विक्रम काळेंनी जिंकली आहे.

महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांनी या निवडणुकीत भाजपच्या किरण काळे यांचा एकूण 6 हजार 625 मताच्या फरकाने पराभव केला आहे. आज सकाळपासून विधानपरिषदेच्या पाचही जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरु होती.

अखेर विक्रम काळे यांचा विजय झाल्याचं घोषित करण्यात आलं असून मतमोजणीच्या सर्व फेरीत आघाडीवर विक्रम काळे हेच आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, आज माझे वडील वसंतराव काळे यांची आज पुण्यतिथी असून माझ्या विजयामुळे मला निवडून दिलेल्या शिक्षकांनी माझ्या वडीलांना एकप्रकारे आदरांजली वाहीलीय, अशी माझी भावना असल्याची प्रतिक्रिया काळे यांनी विजयानंतर दिली आहे.

तसेच सुशिक्षित मतदारांसह शिक्षक वर्गासाठी केलेल्या कामांमुळेच माझा विजय झाल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलयं. दरम्यान, निवडणुकीपूर्वी विक्रम काळेंचे प्रतिस्पर्धी असलेले सुर्यकांत विश्वासराव यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

सत्ताधाऱ्यांना अमिष दाखवून संस्थाचालकांच्या माध्यमातून दबाव टाकून हा विजय घेतला असल्याचा सुर्यकांत पाटील यांनी विक्रम काळेंच्या विजयानंतर आरोप केला आहे. तर पराभव झाल्यानंतर अशी टीका केली जात असल्याचं प्रत्युत्तर काळे यांनी दिलंय.

गेल्या महिनाभरापासून विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. 30 जानेवारी रोजी राज्यातील पाचही विभागांचं मतदान पार पडलंय. अखेर या पाचही मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीस आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झालीय.

मतमोजणीच्या सुरवातीला मतपेट्या उघडून मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर मतांचे २५-२५ चे गठ्ठे करुन मोजणीसाठी ५६ टेबलवर प्रत्येकी ४० गठ्ठे देण्यात आले. दुपारी १२ वाजेपासून वैध-अवैध मतांचे वर्गीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली होती.

दरम्यान, भाजपचे किरण पाटील आणि महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांच्यात मुख्य लढत झाली असून या चुरशीच्या लढतीत अखेर विक्रम काळे यांनी सलग चौथ्यांदा निवडून येत विक्रमच केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube