मोठी बातमी! 10 लाखांचं प्रकरण अंगलट, रणजीत कासलेवर अंबाजागाईमध्ये गुन्हा दाखल

मोठी बातमी! 10 लाखांचं प्रकरण अंगलट, रणजीत कासलेवर अंबाजागाईमध्ये गुन्हा दाखल

Beed Crime news: बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासलेच्या (Ranjeet Kasale) अडचणीत वाढ झाली. कासलेवर आणखी एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आलाय. कासलेने सुदर्शन काळे यांच्याकडून मुलाच्या शिक्षण शुल्कासाठी पैशांची गरज असल्याने १० लाख रुपये उसने घेतले होते, त्यातील अडीच लाख रुपये परत न केल्याचा आरोप कासलेवर करण्यात आला. या प्रकरणी कासले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नौदलाची ताकद वाढणार! भारत आणि फ्रान्समध्ये अत्याधुनिक राफेल-एम विमानांसाठी 63,000 कोटींचा करार 

समोर आलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहरात कासलेंविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. परळी विधानसभा निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे यांच्या माणसाने स्ट्राँग रूमपासून दूर राहण्यासाठी मला १० लाख रुपये दिल्याचा दावा कासलेंनी केला होता. परंतु आता त्यांचा दावा खोटा असल्याचे समोर आलंय. त्यांनी पैसे परत न केल्याने काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

कासलेला हर्सूल कारागृहात हलवले…
संतोष देशमुख खून प्रकरणातील वाल्मिकी कराडसह सुदर्शन घुले आणि अन्य आरोपी बीड कारागृहात आहेत. रणजीत कासले हा देखील बीड कारागृहात होता. मात्र, त्याला आता छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कासलेने वाल्मिकी कराड याच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव रणजीत कासलेला बीड तुरुंगातून हलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. कासले सध्या अॅट्रॉसिटी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे.

बिलावल भुट्टोला असदुद्दीन ओवैसींनी दाखवली जागा, पहलगाम हल्ल्यावरुन पाकिस्तानावर हल्लाबोल 

कासलेवर गुन्हे किती?
१) शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
२) निवडणुकीच्या काळात कर्तव्यावर नसताना खळबळजनक दावे केल्याने परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

३) अंबेजोगाई शहरातील एका व्यक्तीची ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबेजोगाई शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

४) उसने घेतलेले पैसे परत न केल्याने अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात कासले विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रणजीत कासलेने पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यानंतर बीडच्या पोलिस अधीक्षकांनी कासलेला सेवेतून बडतर्फ केलं. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्याविषयी कासलेने गौप्यस्फोट केलेले आहेत. वाल्मिकी कराडच्या एन्काऊंटरची सुपारी देण्याचा प्रयत्न झाल्याचं कासले म्हणाला होता. धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होता, असं कासलेचं म्हणणं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube