विरोधकांची तुफान टीका, शिंदेंनी ‘मुक्काम’च बदलला; ‘सुभेदारी’त राहणार CM

विरोधकांची तुफान टीका, शिंदेंनी ‘मुक्काम’च बदलला; ‘सुभेदारी’त राहणार CM

Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगर येथे आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 140 रूम्स आलिशान हॉटेलमध्ये बुक करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या अलिशान सुटमध्ये राहणार होते त्याचे भाडे 32 हजार रूपये असून या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून ‘सुभेदारी’ थाट करण्यात आला होता. याशिवाय मंत्री, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांच्या दिमतीला 300 गाड्यांचा ताफा ठेवण्यात आला होता. राज्यातील नागरिक आणि शेतकरी दुष्काळाच्या संकटाला तोंड देत असताना एका बैठकीसाठी होत असलेला कोट्यावधींचा खर्च पाहून विरोधकांचा पारा चढला. त्यांनी सरकारवर तुफान टीका सुरू केली. मग, सरकारलाही आपलं कुठेतरी चुकतंय, जनतेचा रोषही वाढू शकतो याचा अंदाज आल्याने माघार घेतली. फाइव्ह स्टार हॉटेलात राहण्याचा निर्णयच बदलला.

‘मीच फडणवीसांना संधी दिली पण, त्यांनीच माझा छळ केला’; नाथाभाऊंचा घणाघात

आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तिघांचाही मुक्काम सुभेदारी या विश्रामगृहातच असणार आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांचा (Eknath Shinde) सुधारीत दौरा प्रसिद्ध करण्यात आला. त्यात ते मंत्रिमंडळ बैठकीनंतर सुभेदारीत मुक्काम करणार असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारीच शहरात आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री उशीरापर्यंत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि आमदारांशी संवाद साधला.

याआधी मराठवाड्यात ज्या कॅबिनेट बैठकी झाल्या त्यावेळी मंत्र्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहातच असायचा. शिंदे (Eknath Shinde) ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करणार होते त्या खोलीचे नुसते भाडेच जवळपास 32 हजार रुपये होते. याशिवाय दुसरे फाईव्ह स्टार हॉटेल असलेल्या ताज हॉटेलमध्ये सर्व सचिवांसाठी 40 रूम्स बुक करण्यात आल्या असून, उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकाऱ्यांसाठी अमरप्रीत हॉटेलमधील 70 तर, अजंता अॅम्बेसेडरमध्ये 40 रूम बुक करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या उधळपट्टीवर विरोधकांनी तुफान टीका केली होती. त्यानंतर माघार घेत सरकारने प्लॅन बदलला आहे. मुख्यमंत्री शिंदे आता शासकीय विश्रामगृहातच राहणार आहे. याव्यतिरिक्त आणखी कोणत्या खर्चाला कात्री लावण्यात आली, हे देखील लवकरच समजेल.

Aurangabad : मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी CM शिंदेंची ‘सुभेदारी’ 32 हजारांचा सुट अन् 300 गाड्या

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube