अपघातानंतर पहिल्यांदाच Dhananjay Munde परळीत, जोरदार स्वागत !

  • Written By: Published:
अपघातानंतर पहिल्यांदाच  Dhananjay Munde परळीत, जोरदार स्वागत !

बीडः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे मागील महिन्यात कार अपघातात जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबईत उपचार झाल्यानंतर तब्बल चाळीस दिवसानंतर ते आज परळीत (Parli) दाखल झाले आहेत. मुंडेंच्या समर्थकांनी त्यांचे जोरदारपणे स्वागत केले आहे. गहिनीनाथ गडावर वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांचे घराच्यांनी जोरदारपणे स्वागत केले आहे.

परळीत आल्यानंतर त्यांनी प्रथम स्वर्गीय पंडित अण्णांच्या समाधीस्थळी जाऊन अण्णांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर घरी आल्यावर आईने औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले आहे. अपघाताच्या या घटनेतून बाहेर पडून जनसेवेत पुन्हा रुजू होताना स्वर्गीय अण्णा व बाईंचे आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली आहे.
Devendra Fadnavis : जे निधी देत नव्हते त्यांना घरी बसवलं, जे निधी देतात त्यांना….
उपचारानंतर मुंडे हे बीड जिल्ह्यात प्रथमच आले आहे. त्यांनी पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे जाऊन वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री मुंडे यांचे स्वागत करून आशीर्वाद दिले. धनंजय मुंडे यांच्या समर्थक-कार्यकर्त्यांनी त्यांचे गडावर स्वागत केले. स्वागतासाठी सुमारे 5 क्विंटल फुलांचा हार घालण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून स्वागत केले. तर काही ठिकाणी मुंडे यांचे पोस्टर लावण्यात आले होते.

यावेळी आष्टी-पाटोदा-शिरूर कासारचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंडेंच्या स्वागतासाठी विशेष गाड्या, सजावट, बॅनर्ससह मोठी जंगी तयारी दिसून आली. धनंजय मुंडेंची शहरभरातून मिरवणूकही काढण्यात येणार आहे. त्यांची सभाही परळीत होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube