Marathwada Teacher Constituency Election : जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंना धक्का
बीड : मराठवाडा संघ निवडणुकीत एका दिवसावर येऊन ठेपली असताना मोठ्या घडामोडींना वेग आलाय. ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर (Jaidatta Kshirsagar) यांनी मराठवाडा शिक्षक संघ निवडणुकीत (Marathwada Teacher Constituency Election) अखेरच्या क्षणी भाजप (BJP) उमेदवाराला पाठिंबा दिलाय. त्यावरुन जयदत्त क्षीरसागर यांची भाजपबरोबरची नजीकता वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपकडून किरण पाटील (Kiran Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता जयदत्त क्षीरसागर यांनी शेवटच्या क्षणी किरण पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानं हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळेंसाठी हा (Vikram Kale) मोठा धक्काच मानला जातोय.
पाच शिक्षक मतदार संघातील निवडणुकांसाठी मतदान सोमवारी(दि.30) पार पडणार आहे. त्यात मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलंय. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वत्र चर्चा सुरुय. या मतदारसंघात माजी मंत्री आणि शिवसेनेतून निलंबित केलेले नेते जयदत्त क्षीरसागर हे नेमकी काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अखेर शेवटचा क्षणी क्षीरसागरांनी आपला पाठिंबा भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना दिलाय.
क्षीररसागर यांनी अधिकृतपणे किरण पाटील यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केल्यानं राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळेंना हा मोठा धक्का मानला जातोय. भाजप निवडणूक प्रभारी राणा जगजितसिंह पाटील यांनी बीडमध्ये येऊन जयदत्त क्षीरसागर यांच्या नवगण महाविद्यालयात समर्थक, संस्था चालकांसोबत बैठक घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर देखील उपस्थित होते.