तहसिलदाराची दुष्काळाच्या बैठकीला दांडी…जिल्हाधिकाऱ्यांनी थेट घरचा रस्ता दाखवला!

बीडमध्ये दुष्काळाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने केज येथील तहसीलदार भारत गंगावणे यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केलीयं.

Tahasildar

Beed News : बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या (Drought) बैठकीला दांडी मारणे एका तहसिलदाराला चांगलंच भोवलंय. राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर बीडमध्ये दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केजचे तहसिलदार भारत गंगावणे गैरहजर राहिले होते. या घटनेची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत थेट कारवाई करीत तहसिलदारांचा पदभार काढला आहे. या घटनेने बीडमध्ये एकच खळबळ उडालीयं.

लालबागच्या राजाच्या चरणी 6 कोटी 11 लाखांची देणगी; सोने-चांदीच्या वस्तूंचा उद्या लिलाव

बीडमध्ये दुष्काळावर उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन गंभीर असून दुष्काळाबाबत चालढकल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडण्यापूर्वी परवानगी घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले होते. अशातच तहसिलदार भारत गंगावणे हे दुष्काळाच्या आढावा बैठकीला गैरहजर होते. गंगावणे यांचा पदभार काढत नायब तहसिलदार अशोक भंडारे यांच्याकडे प्रभारी पदभार दिला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बारामतीतील दुहेरी हत्येने खळबळ; ‘वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणा’, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनही आता ॲक्शन मोडवर आले होते. दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना अधिकारी मुख्यालयावर उपलब्ध असणं गरजेचं असल्याने बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अधिकाऱ्यांना परवानगीशिवाय रजा घेता येणार नाही, तसंच परवानगीशिवाय मुख्यालयही सोडता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनातील अधिकारी सज्ज राहावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

follow us