‘सगेसोयरे’ कायद्याच्या अंमलबजावणीशिवाय माघार नाही, उपोषणही सोडणार नाही’; जरांगेंचा निर्धार

‘सगेसोयरे’ कायद्याच्या अंमलबजावणीशिवाय माघार नाही, उपोषणही सोडणार नाही’; जरांगेंचा निर्धार

Manoj Jarange : सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थिती आंदोलन मागे घेणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे. 20 तारखेपर्यंत तरी आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागणार आहे. त्यांनीही विश्वास गमावू देऊ नये. 20 तारखेपर्यंत सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय सुट्टी नाही असा निर्धार व्यक्त करत आंतरवालीसह सर्व केसेस मागे घ्या. शिंदे समितीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ द्या, अशा मागण्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केल्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कुणबी नोंदी नसलेल्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे सांगितले.

शिंदेंनी तिढा सोडवला! जे कुणबी त्यांना आधीपासूनचे आरक्षण, नोंदी नसलेल्यांना स्वतंत्र आरक्षण

जरांगे पुढे म्हणाले, तुम्ही अधिसूचना काढता मग त्याची अंमलबजावणी का करत नाही. सरकार आरक्षणासाठी सकारात्मक आहे हे आम्हालाही माहिती आहे मग अधिसूचना काढूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने जनता शिंदे-फडणवीसांवर नाराज आहे. शिंदे फडणवीसांचा गोड गैरसमज झाला आहे की नोंदी असलेल्यांना हे देऊ आणि नोंदी नसलेल्यांना ते देऊ तो गैरसमज काढावा कारण आम्हाला सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी हवी आहे. त्याशिवाय सरकारची सुट्टी नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी सगेसोयरेची अधिसूचना लक्षात ठेवावी. मराठ्यांच्या लढाईमुळे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला आहे. राज्यात कुणबी नोंदी सापडलेल्या सर्वांना प्रमाणपत्र मिळणार. सगळा कुणबी मराठाच आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले.

Manoj Jarange : ‘नाशिक दौऱ्यात अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

नारायण राणेंना आवरा नाहीतर.. 

यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. निलेश राणेंना माझं सांगणं आहे तु्म्ही त्यांना थांबवा. नारायण राणेंबाबत मी काहीच बोललो नाही.  पंतप्रधान मोदींना ओबीसींचा स्वाभिमान आहे. आम्ही तर मराठ्यांच्या बाजूने बोललो तुम्हाला त्याचा अभिमान असला पाहिजे. त्यांचं वय आहे म्हणून त्यांचा आदर करतोय पुढे मात्र पाणउतारा करू त्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. आता त्यांना ही शेवटची संधी आहे. उद्या जर काही बोलले तर सोडणार नाही असा इशारा त्यांनी राणेंना दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube