‘जनतेचे पैसे खाल्ले अन् दोन वर्ष आतून बेसन खाऊन आले’; जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

‘जनतेचे पैसे खाल्ले अन् दोन वर्ष आतून बेसन खाऊन आले’; जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  (Manoj Jarange Patil) यांची आतंरवाली सराटी गावात जाहीर सभा होत आहे. लाखोंच्या संख्येने समाजबांधव या सभेसाठी उपस्थित आहेत. जरांगे पाटील यांनी या सभेत आता दहा दिवसात सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे असा निर्वाणीचा इशारा दिला. तसेच मंत्री छगन भुजबळांना आवर घाला, अशी विनंती अजित पवार यांना करतो असे म्हणाले. छगन भुजबळांना समज द्या, माझ्या नादाला लागले तर काही खरं नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. छगन भुजबळ यांनी सभेच्या खर्चावरून संताप व्यक्त करत जरांगे पाटलांनी त्यांच्यावर घणाघात टीक केली.

माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही म्हणणारे भुजबळ आता विरोधात बोलत आहेत. ते आता फडफड करत आहेत. सभेला सात कोटी खर्च आल्याचे छगन भुजबळ म्हणाल. मात्र सभेसाठी शंभर एकर जमीन शेतकऱ्याने फुकट दिली. येऊन विचार. असे जरांगे पाटील म्हणाले.

सरकारच्या हातात दहा दिवस, आरक्षण घेणारच! सभेआधीच जरांगे पाटलांचा इशारा

भुजबळ म्हणतात, लोक 10 रुपये देत नाहीत. त्यांना देत नसतील पण आम्हाला देतात. तुम्हाला का पैसे देत नाहीत मी सांगतो. गोरगरीब मराठा जनतेनं तुम्हाला मोठं केलं. त्यांचं रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला म्हणून तुमच्यावर धाड पडली. जनतेचे पैसे खाल्ले आणि दोन वर्ष आतून बेसन खाऊन आले आणि आम्हाला शिकवतात.

अजितदादा भुजबळांना समज द्या, नाहीतर..

मंत्री छगन भुजबळांना आवर घाला, अशी विनंती अजित पवार यांना करतो असे म्हणाले. छगन भुजबळांना समज द्या, माझ्या नादाला लागले तर काही खरं नाही. आम्ही सभेसाठी 123 गावांतून निधी जमा केला. आम्ही घाम गाळतो.  राज्यातील मराठा समाज निधी द्यायला तयार होता. पण इतर गावांकडून आम्ही पैसे घेतले नाहीत. भुजबळांना आम्ही ऑन कॅमेरा हिशोब द्यायला तयार आहोत, असे जरांगे पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube