Maratha Reservation : बीडमध्ये आरक्षणाची धग कायम! महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं…
Maratha Reservation : जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता राज्यभरात मराठा समाजाकडून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करुन मराठा आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे, अशातच आता बीडमधील वासनवाडी ग्रामपंचायतसमोर मराठा आरक्षणासाठी महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेत आंदोलन केलं आहे. या आंदोलनादरम्यान, जमिनीत गाडलेल्या अवस्थेत महिलांकडून “आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच” अशा घोषणा दिल्या जात आहेत.
अद्यापही चर्चेचा निरोप नाही; उद्यापर्यंत वाट बघणार, त्यानंतर… : मनोज जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा
जालना घटनेनंतर राज्यातील विविध जिल्ह्यांत मराठा आंदोलनकांनी आक्रमक भूमिका घेतली असून बीड जिल्ह्यात जालना मराठा आंदोलनाचे पडसाद उमटत असल्याचं दिसून येत आहे. एकीकेड राज्य सरकारकडून मराठवाड्यातील मराठा तरुणांना कुणबी दाखले देण्यासंदर्भात अध्यादेश काढला असला तरीही सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमधील अनेक तालुक्यांत आंदोलने अद्याही सुरुच ठेवण्यात आल्याचं चित्र दिसून येत आहे.
‘…तर पवारांनी आझाद मैदानावर उपोषण करावं’; मराठा आरक्षणावरून सदाभाऊ खोतांचं आव्हान
दुसरीकडे जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमधील गेवराईमध्ये मराठा आंदोलकांकडून एसटी बस जाळण्यात आल्याची घटना घडली. तर जिल्ह्यातील काही ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर मराठा क्रांती मोर्चाच्या आवाहनाने आंदोलन सुरु आहे.
MK Stalin : मुलासाठी बाप मैदानात; उदयनिधींच्या वक्तव्यावर CM स्टॅलिन यांनी सोडले मौन
बीडमधील गेवराई भागात मध्यरात्रीच्या सुमारास एसटी जाळण्यात आली असून पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही गावात सकल मराठा समाजाकडून उपोषण सुरुच आहे, तर पिट्टी नायगावमध्येही आज सलग पाचव्या दिवशीही आंदोलकांकडून उपोषण सुरुच आहे. धारुरमधील कारी गावातही तरुणांकडून साखळी उपोषण सुरु असून अनेक गावांमध्ये सत्ताधारी सरकारचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची अंत्ययात्रा काढण्यात येत आहे.
Maratha Reservation :’मी गेलो तरी तुम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे; म्हणत तरुणानं संपवलं आयुष्य
आरक्षण मिळविण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरु आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येत असून आंदोलन सुरू असतानाच गुरुवारी सायंकाळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावरून जोरदार गोंधळ उडाला.
दरम्यान, आंदोलनस्थळी बाचाबाची सुरु असतानाच अचानकपणे जोरदार दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत दहा ते बारा पोलिस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दगडफेकीनंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं.त्यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे.