बीडमध्ये राष्ट्रवादीच्या तोफा धडाडल्या; पण धनंजय मुंडेंवर थेट हल्ला टाळला
बीडः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार गटाने जाहीर सभा सुरू केल्या आहेत. आज बीडमध्ये स्वाभिमानी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, तरुण नेत्यांनी जोरदार भाषणे केली. सर्वांनी शेरोशायरी केली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हा जिल्हा बालेकिल्ला असल्याने त्यांच्यावर थेट हल्लाबोल होईल, असे बोलले जात होते. शरद पवारांसह राष्ट्रवादीचे नेते, स्थानिक नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला टाळला. त्यांचे नावही भाषणात घेण्यात आली नाही. तर आमदार संदीप क्षीरसागर यांचे मात्र सर्वांनी जोरदार कौतुक केले आहे.
‘मोदींनी, देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घ्यावं’, पुन्हा येईनच्या घोषणेवर पवारांची खोचक टीका
शरद पवार यांनी आपल्या भाषणात एक सहकारी पक्ष सोडून गेला आहे. कालपर्यंत ठीक होता. माझ्याबरोबर भवितव्य नसल्याने दुसरा नेता निवडला पाहिजे असे सांगून ते निघून गेले. माझे वय झाले आहे. तुम्ही माझं काय बघितले आहे, असा टोलाही पवारांनी अमरसिंह पंडित यांना लगावला आहे. सामूदायिक शक्ती उभे केली तर काय होते ? हे या जिल्ह्याने दाखवून दिले आहे. ठीक आहे सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचे होते. पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले आहे. त्यांच्याबद्दल माणुसकीला ठेवायची होती. आता लोक योग्य प्रकारे धडा दाखविल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार, केंद्र सरकारच्या कारभारावर पवारांनी जोरदार टीका केली आहे. पण शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मात्र टीका केली नाही.
“थोडी तरी माणुसकी दाखवा..” : साहेबांचं वय झालं म्हणणाऱ्या अमरसिंह पंडितांना पवारांनी धू-धू धुतले…
आमदार संदीप क्षीरसागर यांनी मात्र जोरदार भाषण केले. त्यात त्यांनी धनंजय मुंडे यांची नक्कल केली. कुणाचा पण नाद करायचा, साहेबांचा नाद करायचा नाही, असे क्षीरसागर म्हणाले. परंतु त्यांनी भाषणाच मी त्यांचे नाव घेतलेले नाही, असे सांगून टाकले. धनंजय मुंडेंची हातवर करण्याची स्टाइलही त्यांनी करून दाखविली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंची नाव घेतले. ते राष्ट्रवादीत येण्यासाठी एका वर्षापासून तयार होते. परंतु पवारांनी घेतले नाही. नाईलाजास्तव त्यांना पक्षात घ्यावे लागेल, असे आव्हाड म्हणाले. परंतु त्यांनी मुंडेंवर थेट हल्लाबोल केला नाही. माजी अनिल देशमुख, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही धनंजय मुंडेंवर टीका करण्याचे टाळले आहे. त्याचबरोबर स्थानिक नेत्यांनी आपल्या भाषणात धनंजय मुंडेंवर टीका करणे टाळले आहे.