Pankaja Munde : ‘मुंडे साहेबांनी चिल्लर गोष्टी करायला मला शिकवलं नाही’
बीड: मुंडे बंधू-भगिनीचा संघर्ष राज्याला नवीन नाही. पण काही दिवसांपूर्वीचं अपघातात (accident) जखमी झालेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना भेटण्यासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. नुकतेच धनंजय मुंडे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी परतले आहेत. यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
‘काही लोकांनी माझ्या नावावर लागलेल्या पाट्या रंगवून स्वतःचं नाव टाकलं’ असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. परळी येथील एका मंदिराच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत नरहरी महाराज मंदिराच्या गाभारा आणि शिखर कामाचा तसेच पुनर्निर्माण कामाचा शुभारंभ परळी शहरात करण्यात आला. दरम्यान याच कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे या देखील उपस्थित होत्या.
तर यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी आपले बंधू धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘काही लोकांनी माझ्या नावावर लागलेल्या पाट्या रंगवून स्वतःचं नाव टाकलं’ असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर मुंडे साहेबांनी मला अशा चिल्लर गोष्टी करायला शिकवलं नाही असेही त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी हे केलं ते केले असं मला कधी मोजायची सवय नाही. लोकांनी तर माझ्या कामावर, माझ्या निधीवर बदलून स्वतःचे नावं टाकले असेही मला बघायला मिळाले.
पण अशा चिल्लर गोष्टी करायची मला गरज, नसून मुंडे साहेबांनी मला असे कधी शिकवलं नाही,” असा टोलाही पंकजा मुंडे यावेळी लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.