उद्यापासून Aditya Thackeray यांच्या ‘शिवसंवाद’ यात्रेचा सातवा टप्पा
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिवसंवाद यात्रेचा (Shivsamvad Yatra) सातवा टप्पा उद्यापासून सुरु होणार आहे. नाशिक (Nashik), जालना (Jalna) आणि संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) शिवसंवाद यात्रा जाणार आहे.
शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद सुरु केली होती. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही यात्रा सुरु आहे. आता नाशिक, जालना आणि संभाजीनगरमध्ये या ठिकाणी शिवसंवाद यात्रा जाणार आहे.
शिवसेनेत बंडखोरीकरुन शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या मतदार संघात ही शिवसंवाद यात्रा जाणार आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार हे आदित्य ठाकरे यांच्या निशाण्यावर असणार आहेत. शिवसंवाद यात्रेचा पहिला दिवस मुंडेगाव येथून सुरु होणार आहे. दुसरा दिवस निफाड, चांदूर या ठिकाणी शिवसंवाद यात्रा जाणार आहे. तिसऱ्या दिवशी बदनापूर, सुमठाणा येथून शिवसंवाद यात्रेचा प्रवास असणार आहे.
या संपूर्ण शिवसंवाद यात्रेत भावनिक साद घालण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांचा असणार आहे. त्यामुळे शिंदे गट आणि त्यांचे आमदार हे आदित्य ठाकरे यांच्या टार्गेटवर असणार आहेत. या काळात काही कार्यकार्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे.