Road Accident : कार-दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Road Accident : कार-दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

बीड : जिल्ह्यातील (Beed) माजलगाव (Majalgaon) येथे भीषण अपघात (Beed Accident)झाला आहे. माजलगाव तेलगाव रोडवर बुधवारी संध्याकाळी स्विप्ट आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झालाय. माजलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अपघातावेळी उपस्थितांची आणि गाडी चालकांची चौकशी सुरु आहे.

माजलगाव ते तेलगाव रोडवरील शिंदेवाडी फाट्याजवळ कारनं दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये लहामेवाडी येथील तीन तरुणांचा मृत्यू झालाय. दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण उपचारादरम्यान मृत पावला. बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान, हा भीषण अपघात झालाय.

लहामेवाडी येथील लक्ष्मण सुभाष कापसे (वय 32), नितीन भाऊसाहेब हुलगे (वय 30) आणि आण्णासाहेब बळीराम खटके हे तिन्ही तरुण तेलगाव येथील कापूस जिनिगवर कार्यरत होते. ते दररोज दुचाकीनं येथे कामाला ये जा करतात. आज रात्री ते काम आटोपून तेलगावहून लहामेवाडीकडं परत येत होते.

त्याचवेळी त्यांच्या दुचाकीला माजलगाव-तेळगाव रोडवर गावकडून येणाऱ्या स्विफ्ट कारनं धडक दिली. ही अपघात इतका मोठा होता की, त्यात लहामेवाडी येथील दुचाकीवरील लक्ष्मण कापसे, आण्णासाहेब खटके यांचा जागीच मृत्यू झाला. तर नितीन हुलगे यास उपचारार्थ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मयत घोषित केले. एकाच गावातील तिघांचा अपघाती मृत्यू झाल्यानं माजलगाव तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होतेय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube