वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक; परभणीतील प्रकार

लाच लुचपत विभागाच्या टीमने पकडल्यानंतर हे पैसे माझे नाहीत, म्हणून खंदारे यांनी ते पैसे फेकून देण्याचा प्रयत्न केला.

News Photo   2026 04 08T203110.278

परभणीत शासकीय कार्यालयांमध्ये (Parbhani) लाचखोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याचं आता सिद्ध झालं आहे. कारण, आज एकाच दिवशी दोन लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत. त्यामुळे, जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता तरी सरकारी कार्यालयात पैस दिल्याशिवाय काम होईल की नाही, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

पालम येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ. रमेश खंदारे यांचा रुग्णालयातील कापड स्वच्छता कंत्राटदार यांच्याबरोबर व्यवहार होता, त्याच अनुषंगाने त्यांनी त्याला 50 हजारांची लाच मागितली. त्यानुसार, कंत्राट दाराकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना एसीबीच्या एका टीमने अटक केली.

गर्भलिंगनिदान आणि गर्भपात रॅकेटबाबत धक्कादायक माहिती समोर, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकरण

दरम्यान, लाच लुचपत विभागाच्या टीमने पकडल्यानंतर हे पैसे माझे नाहीत, म्हणून खंदारे यांनी ते पैसे फेकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसीबीने त्यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील भूमी अभिलेख मधील वरिष्ठ लिपिक बिडकर यांनी चुकीची मोजणी करून नकाशा बनवला होता.

आता तीच मोजणी पुन्हा करुन अचूक नकाशा बनवून देण्यासाठी संबंधित नागरिकाकडे आठ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार, तक्रारदाराकडून लिपिक बिडकर यांच्याकडून लाचेची रक्कम आठ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. दरम्यान, दोन्ही प्रकरणात तपास केला जात आहे.

Tags

follow us