ज्येष्ठ नेते शरद पवार, राणे अन् मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक; सीमाप्रश्नावर घेतला मोठा निर्णय

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधिमंडळात बैठक झाली.

News Photo   2026 07 08T185819.354

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित (Maharashtra) कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नाच्या संदर्भात उच्चाधिकार समितीची आज बैठक पार पाडली. या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार नारायण राणे आणि सीमा भागातील सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या बैठकीत सीमाप्रश्नी न्यायालायीन लढाई अधिक ताकदीने लढण्याचा निर्णय झाला.

दोन राज्यांमधील हा वाद अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे. त्यातच, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी या बैठकीला विधिमंडळात हजेरी लावली. यापूर्वी 1996 मध्ये अधिवेशन काळात त्यांनी बैठकीला उपस्थिती दर्शवल्याची माहिती आहे. त्याच अनुषंगाने बैठकीमध्ये, सीमाप्रश्नावर राज्य सरकार कोर्टाची ही लढाई ताकदीने लढणार आहे, यावर एकमत झाल्याची माहिती आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र हा एकत्रित झाला पाहिजे अशी भूमिका या बैठकीत सर्व नेत्यांनी मांडली.

शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत येणार का ? देवेंद्र फडणवीसांचे दिल्लीत मोठे विधान

दरम्यान, शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात भेट दिली, इथेच राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. यावेळी, कॅबिनेट बैठकीसाठी जात असलेल्या एकनाथ शिंदेंनी आधी कार्यालयात येऊन शरद पवारांचे स्वागत केले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सीमाप्रश्नाची बैठक संपल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला मुंबईत असून देखील रोहित पवार गैरहजर होते, मुंबईत शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे.

एकीकडे शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सरु असतांना दुसरीकडे मात्र आझाद मैदानातील शिक्षक आंदोलनाला रोहित पवारांची उपस्थिती दिसून आली. तत्पूर्वी, रोहित पवारांनी स्वतः ट्विट करत आपण शिक्षक आंदोलनाला उपस्थित राहणार आहोत. मात्र, शरद पवार विधिमंडळात येणार असल्याने आपण उशिरा आंदोलनस्थळी पोहचू अस म्हंटलं होतं. मात्र, ट्विट करून देखील रोहित पवारांनी शरद पवारांच्या बैठकीला उपस्थित न राहता शिक्षक आंदोलनात सहभागी होणे पसंत केल्याचं दिसून आलं.

follow us