‘आडनाव ठाकरे असून…; आदित्य ठाकरेंवर प्रश्न विचारताच दादा भुसेंची खोचक प्रतिक्रिया

‘आडनाव ठाकरे असून…; आदित्य ठाकरेंवर प्रश्न विचारताच दादा भुसेंची खोचक प्रतिक्रिया

नाशिक : गेल्या ६ महिन्यांपासून तीन शब्दांपलीकडे ते बोलत नाहीत. आता तर ग्रामपंचायत सदस्यांनाही देखील आव्हान देत आहेत. माझे आजोबा (Balasaheb Thackrey) चोरले, अशी टिका करत आहेत. हे सर्व पाहिल्यावर मला आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांची कीव येते, अशी खोचक टिका बंडखोर गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आदित्य ठाकरेंवर यांच्या केली.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांचा समाचार घेतला. केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही, तर लोकांमध्ये सतत फिरावं लागते. आम्ही काही काळासाठी थोडे घराबाहेर पडतो, अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंवर केली.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुसे म्हणाले, की आम्ही सतत जनतेबरोबर राहतो. ६ महिन्यांपासून त्यांना तीन शब्दांच्या पलीकडे बोलता येत नाही. सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. यामुळे विरोधकांकडे बोलण्यासाठी काही मुद्देच नाहीत. त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलले पाहिजे.

आदित्य ठाकरे यांनी आजोबा चोरल्याचे म्हटले आहे, त्यावर भुसे म्हणाले, हिंदुहदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्र्पुरुष आहेत. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या मनाचा कोतेपणा येथे दिसून येतो. उद्या हे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनाही चोरले, असे म्हणतील, हा त्यांच्या मनाचा कमीपणा आहे. केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही, तर लोकांमध्ये सातत्याने असले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube