ड्रग्स माफियांविरोधात आमदार दाते आक्रमक! सभागृहात विषय मांडत वेधले लक्ष
MLA Date against drug mafia यांनी राज्याच्या अधिवेशनात पुन्हा एकदा जनतेच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर विषय सभागृहात मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले
MLA Date is aggressive against the drug mafia! He attracted attention by raising the issue in the House : अहिल्यानगरच्या पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी राज्याच्या अधिवेशनात पुन्हा एकदा जनतेच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर विषय सभागृहात मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. राज्यात विशेषतः पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मॅफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाच्या वाढत्या तस्करीबाबत त्यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती सभागृहात दिली.
Rahul Kul : ‘सुपारीबाजांना’ राहुल कुल यांचा थेट इशारा; आता बदनामी करणाऱ्यांचे धाबे दणाणले!
आमदार दाते यांनी विचारलेल्या प्रश्नात पुणे जिल्ह्यातील शिरूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदे व पारनेर परिसरात एमडी या अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. विशेष म्हणजे या प्रकरणात काही पोलिस कर्मचारीही सहभागी असल्याचे तपासातून समोर आले असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित करून शासनाने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
गाढव पाळण्यासाठी केंद्र सरकार देणार 50 लाख रुपये; नक्की योजना काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी शिरूर परिसरात पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीकडून १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा सुमारे २ कोटी १० लाख रुपये किमतीचा मॅफेड्रोन (एमडी) जप्त केला आहे. पुढील तपासात हा अंमली पदार्थ पारनेर तालुक्यातील कोहोकडी येथील व्यक्तीकडून विक्रीसाठी घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधितांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘आया शेर’साठी द पॅराडाइज मेकर्सने 2.5 एकरांवर उभारला स्लम सेट; डिटेल्स वाचून थक्क व्हाल
सदर पोलीस कर्मचाऱ्याने यापूर्वी जप्त केलेल्या मुद्देमालातील अंमली पदार्थ काढून त्याऐवजी मैदा भरल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सध्या या गुन्ह्यातील पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
Economic Survey of Maharashtra-राज्य कर्जबाजारी; प्रत्येक व्यक्तीवर 85 हजारांचे कर्ज
राज्यात अंमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) स्थापन करण्यात आली आहे. सन २०२५ मध्ये राज्यात १३४०.४१ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून ५२३.१७ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
पहिल्याच भाषणात सुनेत्रा पवारांचं महिलांना खास गिफ्ट! ‘लवकर या लवकर जा’ योजनेसह आणखी बरच काही…
पारनेर नगर मतदारसंघासाठी बजेटच्या माध्यमातून ४१ कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध झाला आहे, जनतेच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्नही विधानसभेत प्रभावीपणे मांडुन, विकासकामांसोबतच समाजातील तरुण पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून वाचविण्याचा ठाम प्रयत्न सातत्याने करत आहे, तपासादरम्यान आणखी मोठा साठा उघडकीस आला असून पारनेर तालुक्यातील कुरुंद येथे ९ किलो ६५५ ग्रॅम वजनाचा सुमारे १९ कोटी ३१ लाख रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा सहभागही निष्पन्न झाला आहे अस आमदार काशिनाथ दाते म्हणाले.
