‘लाखो रुपये द्या अन् प्रवेश मिळवा’…’स्टिंग ऑपरेशन’मधून पेपर फुटीची लिंक, रोहित पवारांचा आरोप!

आमदर रोहित पवार यांनी महाराष्ट्र सीईटी परीक्षेतील कथित भ्रष्टाचारसंदर्भात 25 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप केला आहे.

Untitle

MLA Rohit Pawar : लाखो रुपये मोजून ‘सीईटी’ (CET) परीक्षेच्या माध्यमातून देशातील कोणत्याही प्रतिष्ठित संस्थेत थेट प्रवेश मिळवता येतो, असा थेट आरोप करीत शिक्षकांनी स्टिंग ऑपरेशन करीत केलायं. MPSC नंतर आता CET पेपरसंदर्भात शिक्षकांनीच स्टिंग ऑपरेशन करुन घोटाळा समोर आणल्याने राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत शिक्षणव्यवस्थेवर गंभीर आरोप केले आहेत.

सीईट परीक्षेतील कथिक घोटाळ्यांसदर्भात शिक्षकांनी सरकार आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. परंतू कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शिक्षकांनीच स्टिंग ऑपरेशन केलंय. या शिक्षकांनी आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर रोहित पवार यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावून या ‘स्टिंग ऑपरेशन’ची माहिती माध्यमांसमोर मांडली.

25 ते 30 लाख रुपये दिल्यास केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशातील नामांकित महाविद्यालयांमध्ये हवी ती जागा मिळवता येऊ शकते. इतकेच नव्हे, तर जर काही कारणास्तव काम पूर्ण झाले नाही, तर १०० टक्के पैसे परत करण्याची हमीही देत असल्याचं स्टिंग ऑपरेशन केलेल्या व्हिडिओमध्ये ही बाब समोर आलीयं. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी त्वरित ‘विशेष तपास पथक’ स्थापन करण्याची ठाम मागणी केली. याव्यतिरिक्त, कष्टाळू आणि होतकरु विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी आतापर्यंत झालेल्या सर्व सीईटी परीक्षांचे सखोल लेखापरीक्षण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सुरुवातीला विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ही रक्कम वाढवून 23 ते 25 लाख रुपयांपर्यंत नेण्यात आली. ६० मिनिटांची एक ऑडिओ रेकॉर्डिंग जाहीर करणार असून या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये कथित आर्थिक व्यवहाराबाबत बोलणं सुरु असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

follow us