पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी, आमदार तांबेंची अधिवेशनात मागणी…

पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी, हे अजित पवार यांचं स्वप्न होतं, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी अधिवेशनात केलीयं.

Untitle (2)

Mla Satyajeet Tambe : पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी, यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही रेल्वे सरळ मार्गेच जाण्यासाठी केंद्रातील तज्ज्ञ सल्लागारांची समिती नेमून पुढील 3-4 महिन्यांत अभ्यास अहवाल सादर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नाशिक-सिन्नर-संगमनेर-अकोले-नारायणगाव-मंचर-चाकण या मार्गाने रेल्वे सरळ जावी, ही या भागातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांची ठाम मागणी आहे. रेल्वेमार्ग अनावश्यक वळण न घेता सरळ जावा, यासाठी गावोगावी कृती समित्या स्थापन झाल्या असून ठिकठिकाणी रास्ता रोको व आंदोलने सुरू आहेत.

मात्र केंद्र सरकारकडून GMRT (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) संदर्भातील कारण देत मार्ग वळवण्यात आल्याचा संभ्रम नागरिकांमध्ये आहे. माहितीच्या आधारे विचारणा केली असता, संबंधित संस्थेकडून अद्याप कोणतीही तांत्रिक हरकत नोंदवलेली नाही किंवा अधिकृत पडताळणी झालेली नाही, तर हे कारण पुढे कसे केले जाते, हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. हा प्रकल्प सरळमार्गेच व्हावा, यासाठी माझा सातत्यपूर्ण लढा सुरूच आहे.

📌 21 फेब्रुवारी 2024 – तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री (वर्तमान मुख्यमंत्री) देवेंद्र फडणवीस यांची भेट
📌 28 जून 2024 – महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश कुमार जयस्वाल यांच्याशी चर्चा
📌 9 जुलै 2024 – केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट
📌 27 फेब्रुवारी 2025 – मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा
📌 19 डिसेंबर 2025 – हिवाळी अधिवेशनात या विषयावर राज्य सरकारचं लक्ष वेधलं
📌4 मार्च 2025 :- सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या कृती समितीची महत्वपूर्ण बैठक
📌21 मार्च 2025 :- अर्थसंकल्पीय अधिवेशन
📌 12 जुलै 2025 :- पावसाळी अधिवेशन

बायको नांदेना…कंटाळलेल्या जावयाने केला सासऱ्याचा खून…पोलिसांनी उलगडले खुनाचे रहस्य

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, या विषयावर त्यांनी स्वतः केंद्र सरकारसोबत बैठका घेतल्या आहेत. संबंधित आंतरराष्ट्रीय वेधशाळेच्या बफर झोन ( GMRT – जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) मुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे केंद्र सरकारकडून कळविण्यात आले आहे. त्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले. तरीसुद्धा जुन्या सरळ मार्गाच्या जवळ जाणारा पर्याय शोधण्यासाठी केंद्रातील तज्ज्ञ सल्लागारांची समिती नेमून पुढील 3-4 महिन्यांत अभ्यास अहवाल घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

स्व. अजित पवार यांचेही स्वप्न होते की पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी. त्यांनी या मार्गासाठी सातत्याने प्रयत्न केले. हा रेल्वेमार्ग सरळ झाला, तर ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. म्हणूनच पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गाने व्हावी, यासाठी पुढेही सातत्याने संघर्ष सुरूच राहील अस यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले.

follow us