ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला… शहाजीबापूंची पटोलेंवर जळजळीत टीका
ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय, या शब्दांत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जळजळीत टीका केलीय. सोलापूरचे ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाडांच्या अमृत सोहळ्यानिमित्त शहाजीबापू पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. विशेष म्हणजे शहाजीबापूंनी या सोहळ्याला आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतलीय.
Malaika Arora: बॅकलेस ड्रेसमध्ये मलायकाचा बोल्ड अंदाज, अभिनेत्रीला पाहून उडाली अनेकांची झोप
आमदार पाटील म्हणाले, ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काही कळत नाही. अकलूज, काय कुठंय ते त्यांना माहितीये का? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे.
तसेच काँग्रेसकडे दुसरं कोणी नाही म्हणूनच नाना पटोले यांना अध्यक्ष केलं असून राजकारणामध्ये सक्रिय नेत्यांपैकी सर्वात कमी बुद्धी असेलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याचीही जळजळीत टीका त्यांनी यावेळी केलीय. या सोहळ्याला आलेल्या शरद पवारांची भेट घेऊन त्यांनी माझं आणि पवारांचं भावनिक नातं असल्याचंही सांगितलंय. तसेच शरद पवार यांनी मला भेटीत कोणताही मंत्र दिला नसून माझा रस्ता भगव्या झेंड्यासोबत आहे, त्यांचा रस्ता तिरंग्या झेंड्यासोबत असल्याचं त्यांनी शरद पवार भेटीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय.
Uorfi Javed: उर्फी जावेदची चाहत्यांकडे भलतीच मागणी; म्हणाली, ‘आधी पैसे द्या मग मी तुम्हाला..’
यावेळी बोलताना शहाजीबापूंनी नाना पटोलेंसह ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधत टोलेबाजी केलीय. गेल्या चार महिन्यांपासून दररोज सकाळी संजय राऊत राज्यात स्फोट होणार असल्याचं भाकीत करीत आहेत, पण तसा काही स्फोट झाला आहे का? हेच बोलून बोलून ते बारीक झाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असलेल्या द्वेषापोटीच एकत्र येऊन काम करीत असल्याचं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याला सोडलं नसल्याचं दिसून आलं. तसेच काही दिवसांतच राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार असून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा आमच्याच बाजूने लागणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.