२४ तासांत बदलणार औरंगाबाद-उस्मानाबादची नावे; एसटी महामंडळाने दिले आदेश

२४ तासांत बदलणार औरंगाबाद-उस्मानाबादची नावे; एसटी महामंडळाने दिले आदेश

Aurangabad and Osmanabad Renaming : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यांच्या नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर आणि त्यानुसार सरकार दरबारी कार्यवाही सुरू झाल्यानंतर आता एसटी महामंडळाने तातडीने पावले उचलली आहेत. औरंगाबाद बसस्टँडचे नाव ‘मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नाव ‘मध्यवर्ती बसस्थानक धाराशिव’ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.तसेच जिथे जिथे औरंगाबाद नाव असेल तिथे तिथे छत्रपती संभाजीनगर हे नाव द्यावे असे आदेश महामंडळाने दिले आहेत. याबाबत महामंडळाने (ST) राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पत्र पाठवले आहे.

वाचा : अहमदनगरच्या नामांतरावर विखे नमले, आधी विरोध आता केंद्राकडे पाठपुरावा करणार

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता. केंद्र सरकारनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर राज्य सरकारने पुढील कार्यवाही सुरू केली.सामान्य प्रशासन विभाग, नगरविकास विभागानेही अधिसूचना प्रसिद्ध केली.त्यानंतर आता एसटी महामंडळानेही बसस्थानकांच्या नामांतराची तयारी सुरू केली आहे.

Aurangabad : फतेहनगर, औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर, नामांतराचा इतिहास, मागणी किती जुनी आहे?

जुन्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद बसस्थानकांची नावे बदलली जाणार आहेत.तसेच एसटी बसचे फलक, कार्यालयातील नोंदी यांसह जिथे जिथे औरंगाबाद किंवा उस्मानाबाद नाव असेल ते काढून टाकले जाणार आहे.

St

विशेष म्हणजे, या कार्यवाहीसाठी महामंडळाने विभागीय कार्यालयांना 24 तासांचा वेळ दिला आहे. त्यामुळे कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करावी लागणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube