अहमदनगरच्या नामांतरावर विखे नमले, आधी विरोध आता केंद्राकडे पाठपुरावा करणार

अहमदनगरच्या नामांतरावर विखे नमले, आधी विरोध आता केंद्राकडे पाठपुरावा करणार

अहमदनगर : औरंगाबाद आणि उस्मानाबाद (Aurangabad and Osmanabad) जिल्ह्याच्या नामांतरानंतर अहमदनगरच्या (Ahmednagar) नामांतरासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. यापूर्वी त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या भूमिकेवर टीका केली होती. पण आता दोन महिन्यांतच विखेंनी यू र्टन घेतला आहे.

आज माध्यमांशी बोलताना विखे म्हणाले, जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न भावनिक आहे. आहिल्याबाई होळकर यांचे कर्तृत्व मोठं आहे. अहमदनगर जिल्ह्याला त्यांचे नाव देणं ही सर्वांसाठी भूषणावह गोष्ट ठरेल. नामांतराचे स्वागतचं आहे. नामांतरासाठी आपण केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामाध्यामातून नामांतर लवकरात लवकर करू, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

Ranjit Singh Naik Nimbalkar:पहाटेच्या शपथविधीत अजित पवारांचा नाहक बळी गेला

राधाकृष्ण विखेंची दोन महिन्यांपूर्वीची भूमिका
बाहेरच्या लोकांनी येऊन नामांतराविषयी भाष्य करण्यापेक्षा जिल्ह्यातील लोकांच्या काय भावना आहेत या महत्त्वाच्या आहेत. याविषयी मी स्वतः गोपीचंद पडळकर यांच्याशी बोलणार आहे. नामविस्तार करण्यापेक्षा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रित करण्याची जास्त गरज आहे.

सुजय विखे म्हणाले, ‘काही लोकांचा विष कालविण्याचा प्रयत्न’
अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नाव बदलावे किंवा विभाजन करावे अशी मागणी माझ्याकडे कोणीही, कधीही केली नाही. ही मागणी स्थानिक नागरिकांचीही नाही. अहमदनगरमधील जनता जोपर्यंत याबाबत मागणी करत नाही तोपर्यंत जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीने नामांतराची मागणी करणे मला संयुक्तिक वाटत नाही.

अहमदनगरची परंपरा वेगळी आहे. येथे समाजकारण आणि राजकारण अशी जोड देऊन काम केलेले अनेक नेते होऊन गेले. अहमदनगर जिल्हा हा संवेदनशील जिल्हा आहे. राज्याच्या राजकीय पटलावर जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. सामाजिक सलोखा अनेक वर्षे या जिल्ह्याने टिकवून ठेवला आहे. अशा परिस्थितीत कारण नसताना काही लोक यात विष कालविण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांने ते बंद करावे, अशी माझी विनंती आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube